युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 15:48 IST2025-11-02T15:48:09+5:302025-11-02T15:48:20+5:30
Russia-Ukraine War Update: गेल्या सुमारे पावणे चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाची समाप्ती करण्याचे प्रयत्न सातत्याने निष्फळ ठरत आहेत. दरम्यान, रविवारी युक्रेनने रशियावर एक मोठा ड्रोन हल्ला केला.

युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले
गेल्या सुमारे पावणे चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाची समाप्ती करण्याचे प्रयत्न सातत्याने निष्फळ ठरत आहेत. दरम्यान, रविवारी युक्रेनने रशियावर एक मोठा ड्रोन हल्ला केला. काळ्या समुद्रात असलेल्या रशियाच्या तुआप्से बंदराला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तुआप्से बंदराचं मोठ्या प्रमणात नुकसान झालं. बंदराच्या एका भागात आग भडकली. त्याचा फटका रशियाच्या तेल टर्मिनलला बसला. दुसरीकडे या हल्ल्या दरम्यान, युक्रेनचे १६४ ड्रोन पाडण्यात आले, असा दावा रशियाच्या एअर डिफेन्स युनिटने केला आहे.
या हल्ल्याबाबत रशियन वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री युक्रेनकडून करण्यात आलेल्या या ड्रोन हल्ल्यादरम्यान, रशियाच्या एअर डिफेन्स युनिटकडून १६४ युक्रेनी ड्रोन नष्ट करण्यात आले.
तर स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे तुआप्से बंदर परिसरात भीषण आग लागली. त्यामुळे पोर्टवर प्रचंड नुकसान झालं. दरम्यान, क्रास्नोडार प्रशासनाने टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर सांगितले की, तुआप्सेमध्ये झालेल्या यूएव्ही हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जात आहे. हा हल्ला सैन्याची रसद तोडण्यासाठीच्या युक्रेनच्या रणनीतीचा भाग आहे. या हल्ल्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.