युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला, मोठी आग लागली; व्हिडीओ समोर आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 12:02 IST2025-03-14T12:00:39+5:302025-03-14T12:02:43+5:30
युक्रेनने रशियाच्या तेल रिफायनरीवर हल्ला केला असून या हल्ल्यात युक्रेनच मोठं नुकसान झालं आहे.

युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला, मोठी आग लागली; व्हिडीओ समोर आला
गेल्या काही महिन्यांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या ऊर्जा केंद्रावर हल्ले केले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही देशातील वाद मिटवण्याचे प्रयत्न केले. पण, अजूनही यश आलेले नाही. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. युक्रेनने रशियाच्या तेल रिफायनरीवर हल्ला केला असून मोठी आग लागली आहे. पेट्रोल टाकीला आग लावली. ही माहिती गव्हर्नर वेनियामिन इवानोविच कोंड्राटयेव यांनी दिली.
सुनीता विल्यम्स यांचा परतण्याचा मार्ग मोकळा; एलॉन मस्क यांचे अंतराळयान आज झेपावणार
"कीव राजवटीने तुआप्से येथील एका तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला. एका पेट्रोल टाकीला आग लागली. आगीचे क्षेत्रफळ १,००० चौरस मीटरपेक्षा जास्त आहे, आपत्कालीन सेवा कार्यरत आहेत,अशी माहिती कोंड्राटयेव्ह यांनी टेलिग्रामवर दिली.
या हल्ल्यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी सांगितले की ते युक्रेनमध्ये ३० दिवसांच्या युद्धबंदीच्या अमेरिकेच्या प्रस्तावाशी तत्वतः सहमत आहेत परंतु त्यांच्या अटींवर काम करणे आवश्यक आहे आणि यामुळे कायमस्वरूपी शांतता निर्माण होईल यावर भर दिला. तर हा विचारच बरोबर आहे," असे पुतिन यांनी मॉस्को येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
"आम्ही निश्चितच त्याचे समर्थन करतो. पण काही मुद्दे आहेत ज्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे आणि मला वाटते की आपण आपल्या अमेरिकन मित्र आणि भागीदारांसोबत यावर चर्चा करायला हवी, असंही पुतीन म्हणाले.
युद्धबंदीचे संभाव्य उल्लंघन रोखण्यासाठी एक यंत्रणा विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, आणखी एक मुद्दा म्हणजे युक्रेन ३० दिवसांच्या युद्धबंदीचा वापर सैन्याची जमवाजमव आणि पुनर्शस्त्रीकरण सुरू ठेवण्यासाठी करू शकेल का?, असा मुद्दा पुतीन यांनी उपस्थित केला.
प्रस्तावासोबत सहमत
पुतिन म्हणाले, 'आम्ही लढाई थांबवण्याच्या प्रस्तावांशी सहमत आहोत, पण युद्धबंदीमुळे कायमस्वरूपी शांतता येईल आणि संकटाची मूळ कारणे दूर केली जातील या गृहीत धरून आम्ही पुढे जात आहोत.' असे दिसते की अमेरिकेने युक्रेनला युद्धबंदी स्वीकारण्यास राजी केले आहे, परंतु युद्धभूमीवरील परिस्थितीमुळे युक्रेनला त्यात रस आहे.
#ruSSian oil refinery caught🔥 in Tuapse, Krasnodar region...#Ukraine#UkraineruSSiaWar#ruSSiapic.twitter.com/T8pkARSVaP
— Kiborgz (@Kiborgzzz) March 14, 2025