Epstein Files Prince Andrew: एपस्टिन फाइल्समध्ये नाव आल्यानंतर ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांच्यावरील दबाव वाढत चालला आहे. यापूर्वी त्यांच्या राजेशाही पदव्या काढून घेण्यात आल्या होत्या आणि कुटुंबाशी संबंधित धर्मादाय संस्थांमधूनही त्यांना बेदखल करण्यात आले होते. आता द सन वृत्तपत्राच्या मते , एपस्टिन फाइल्सच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नव्या फोटो आणि मेल्समध्ये प्रिन्स अँड्र्यू एका मुलीसोबत जमिनीवर झोपलेले दाखवले आहेत. त्यानंतर किंग चार्ल्सने त्यांना लंडनमधील विंडरसन हाऊस सोडण्यास सांगितले. त्यामुळे त्यांना अधिकृत विंडरसन निवासस्थानातूनही बाहेर काढण्यात आले आहे. ही कारवाई किंग चार्ल्स यांच्या धाकट्या भावाच्या आदेशावरून करण्यात आली आहे.
प्रिन्स अँड्र्यू कोण आहेत?
प्रिन्स अँड्र्यू हे राणी एलिझाबेथ द्वितीय आणि फिलिप माउंटबॅटन यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म १९६० मध्ये झाला. अँड्र्यू हे ब्रिटिश राजघराण्यातील आहेत आणि त्यांचे मोठे भाऊ किंग चार्ल्स सध्या सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांचे राजघराणे हे ब्रिटनमधील सर्वोच्च कुटुंब मानले जाते. प्रिन्स अँड्र्यू यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गॉर्डनस्टाउन विद्यापीठात घेतले. त्यानंतर ते शिक्षणासाठी कॅनडाला गेले. त्यांनी इतिहास आणि अर्थशास्त्रात पदव्या घेतल्या.
अनेकदा हत्येचा प्रयत्न
प्रिन्स अँड्र्यू १९७८ मध्ये ब्रिटिश नौदलात सामील झाले. १९८२ मध्ये अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या फॉकलंड युद्धामुळे प्रिन्स अँड्र्यू यांना ब्रिटनमध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली. या युद्धात प्रिन्स स्वतः नौदलाच्या वतीने लढले. अर्जेंटिनाने त्यांची हत्या करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु अर्जेंटिना सरकार त्यात सातत्याने अयशस्वी झाले.
आधी आरोप; मग एपस्टिन फाईल्समुळे अडचणी वाढल्या
२०१४ मध्ये प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर पहिल्यांदा लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी व्हर्जिनिया गिफ्रे नावाच्या एका तरुणीने न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी ब्रिटिश राजघराण्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. २०२५ मध्ये एपस्टिनच्या फाईल्स सार्वजनिक झाल्यानंतर, राजघराण्याने अँड्र्यूवर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यातील सर्वात ताजी कारवाई म्हणजे त्यांना विंडरसनमधून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार, अँड्र्यू यांना आता सँडरिंगहॅम येथे हलवण्यात आले आहे. तिथे त्यांना कायमस्वरूपी निवासस्थानात हलवले जाईल, असे सांगण्यात येत आहे.
Web Summary : Prince Andrew faces increased pressure after Epstein files surfaced. Stripped of titles, ousted from charities, and now evicted from Windsor residence by King Charles following new photos.
Web Summary : एपस्टीन फाइल्स के बाद प्रिंस एंड्रयू पर दबाव बढ़ा। उपाधियाँ छीनी गईं, दान से बेदखल, और अब किंग चार्ल्स द्वारा विंडसर निवास से निष्कासित कर दिए गए।