UK-India Relation: युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टार्मर अलीकडेच भारताच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात भारत-यूके दरम्यान सुमारे 3,884 कोटी रुपयांच्या करारांवर स्वाक्षरी झाली. परंतु भारत भेटीनंतर अवघ्या काही दिवसांतच स्टार्मर तुर्कीच्या दौऱ्यावर गेले आणि भारताच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या देशासोबत 10.7 अब्ज डॉलर्सचा लष्करी करार केला. यामुळेच यूके भारताशी डबल गेम खेळतो आहे का? प्रश्न उपस्थित होत आहे.
भारत भेटीत 3,800 कोटींची डील
9 ऑक्टोबर रोजी कीर स्टार्मर भारतात आले होते आणि या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि संरक्षण विषयक करार झाले. ब्रिटन भारतीय सैन्याला हलक्या वजनाच्या क्षेपणास्त्रांची पूर्तता करणार आहे. या क्षेपणास्त्रांचे उत्पादन फ्रान्सच्या थेल्स कंपनीच्या उत्तर आयर्लंडमधील प्लांटमध्ये केले जाईल. ब्रिटन सरकारच्या म्हणण्यानुसार, या करारामुळे सुमारे 700 ब्रिटिश नोकऱ्या टिकून राहतील, ज्या सध्या युक्रेनला शस्त्रसामग्री पुरवणाऱ्या कारखान्याशी संबंधित आहेत. या कराराला दोन्ही देशांमधील “कॉम्प्लेक्स वेपन्स पार्टनरशिप” च्या दिशेने मोठी झेप मानली जाते.
तुर्कीसोबत 10.7 अब्ज डॉलर्सची डील
भारत दौऱ्यानंतर अवघ्या काही दिवसांतच, स्टार्मर तुर्कीच्या दौर्यावर गेले. 27 ऑक्टोबर रोजी त्यांनी तुर्कीला 20 युरोफायटर टायफून फायटर जेट्स विकण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. हा करार जवळपास 10.7 अब्ज डॉलर्स इतकी मोठी आहे. ब्रिटनच्या मते, तुर्कीला या जेट्सची पहिली खेप 2030 पर्यंत मिळेल. ब्रिटनने सांगितले की, या व्यवहारावर चर्चा 2023 मध्येच सुरू झाली होती.
तुर्कीचा ‘पाकिस्तान प्रेम’ आणि भारताचे प्रत्युत्तर
तुर्की आणि भारताचे संबंध कायमच चढउताराचे राहिले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानचे समर्थन केले होते. एवढेच नव्हे तर त्याने कराची बंदरावर युद्धनौका पाठवल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर भारतीय नौदलाने तुर्कीविरुद्ध धोरणात्मक हालचाली सुरू केल्या. भारताने तुर्कीच्या शेजारी देशांशी( ग्रीस, सायप्रस आणि आर्मेनिया) मजबूत लष्करी संबंध प्रस्थापित केले.
यूकेचा स्वार्थ आणि जागतिक राजकारणातील वास्तव
सत्य हेच आहे की, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कायमस्वरूपी मित्र वा शत्रू नसतात, फक्त राष्ट्रीय स्वार्थ असतो. यूके त्याचाच अवलंब करत आहे. एकीकडे यूके भारताशी करार करतोय, पण त्याच वेळी भारताच्या विरोधक देशाशीही अब्जावधींचे करार पूर्ण करतोय.
Web Summary : UK Prime Minister's India visit yielded ₹3,884 crore deals. Days later, a $10.7 billion arms deal with Turkey raises questions. Turkey's pro-Pakistan stance contrasts with UK's India ties, highlighting national interests in international relations.
Web Summary : ब्रिटेन के पीएम की भारत यात्रा से ₹3,884 करोड़ के सौदे हुए। कुछ दिनों बाद, तुर्की के साथ $10.7 बिलियन के हथियार सौदे से सवाल उठते हैं। तुर्की का पाकिस्तान समर्थक रुख ब्रिटेन के भारत संबंधों के विपरीत है, जो अंतरराष्ट्रीय संबंधों में राष्ट्रीय हितों पर प्रकाश डालता है।