Rishi Sunak : ऋषी सुनक ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अव्वल, चौथ्या फेरीतही 118 मतांनी आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 20:59 IST2022-07-19T20:57:56+5:302022-07-19T20:59:23+5:30
Rishi Sunak : आता पुढील फेरीत ऋषी सुनक, पेनी मॉर्डाउंट आणि लिझ ट्रस यांच्यात सामना होणार आहे.

Rishi Sunak : ऋषी सुनक ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अव्वल, चौथ्या फेरीतही 118 मतांनी आघाडीवर
ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) हे आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीच्या मतदानात ऋषी सुनक यांना 118 मते मिळाली आहेत. यासह माजी मंत्री कॅमी बॅडेनोच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यांना 59 मते मिळाली.
त्यामुळे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत केवळ तीन उमेदवार राहिले आहेत. व्यापार मंत्री पेनी मॉर्डाउंट यांना 92 आणि परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांना 86 मते मिळाली आहेत. आता पुढील फेरीत ऋषी सुनक, पेनी मॉर्डाउंट आणि लिझ ट्रस यांच्यात सामना होणार आहे.
UK Prime Minister Race | Rishi Sunak leads vote for the Conservative leadership, Kemi Badenoch eliminated: Reuters
— ANI (@ANI) July 19, 2022
(File pic) pic.twitter.com/gV7mcFvzdG
गुरुवारपर्यंत केवळ दोनच उमेदवार अंतिम यादीत स्थान मिळवू शकतील. सोमवारी झालेल्या तिसऱ्या फेरीच्या मतदानात माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांना 115 मते मिळाली. तसेच, दुसऱ्या फेरीत 101 तर पहिल्या फेरीत 88 मते मिळाली होती. दरम्यान, ऋषी सुनक सर्व टप्प्यांवर आघाडीवर राहिले आहे.
दरम्यान, ब्रिटनचे काळजीवाहू पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर ब्रिटनचा पुढील पंतप्रधान कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. यात ऋषी सुनक ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
ऋषी सुनक यांच्याविषयी...
ऋषी सुनक यांचे आई-वडील 1960 मध्ये भारतातून ब्रिटनला गेले होते. 1980 साउथम्पैटनमध्ये ऋषी सुनक यांचा जन्म झाला. वडील डॉक्टर होते. ऋषी सुनक यांना आणखी दोन भावंडे आहेत. ब्रिटेन विंचेस्टर कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्समधून पदवी घेतली होती. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीतून फिलॉसॉफी आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला. ते काही काळ गोल्डमैन सॅक्समध्ये काम करत होते. नंतर हेज फंड फर्म्समध्ये पार्टनर बनले. स्टैनफोर्ड यूनिवर्सिटीमध्ये एमबीए करत असताना त्यांची ओळख अक्षता मूर्तिसोबत झाली. यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांना कृष्णा आणि अनुष्का अशी दोन मुले आहेत.