शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 16:27 IST

सरकारी बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून इंग्लंडमध्ये फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

लंडन - सरकारी बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून इंग्लंडमध्ये फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात विजय माल्या याने दाखल केलेली याचिका इंग्लंडमधील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मिळालेली मंजुरी हे भारतीय तपासयंत्रणांना मिळालेले मोठे यश असून, आता माल्ल्याच्या मुसक्या आवळून त्याला काही दिवसांतच भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. 

बँकांचे सुमारे नऊ हजार रुपयांचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या परदेशात फरार झाला होता. त्यानंतर तो इंग्लंडमध्ये असल्याची माहिती समोर आल्यापासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातील याचिकेवर लंडनमधील न्यायालयात सुनावणी सुरू होती. दरम्यान,  विजय माल्या याने काही दिवसांपूर्वी सरकारी बँकांना ऑफर दिली होती. सरकारी बँकांनी माझ्याकडे पैसै घ्यावेत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला वाचवावे, अशी ऑफर माल्याने दिली होती. जेट एअरवेज कंपनी आर्थिक अडचणीत असून कंपनीचे चेअरमन नरेश गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कर्जदात्यांकडून 1 हजार 500 कोटी रुपयांची मदत मिळावी म्हणून नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनीता गोयल यांनी पद सोडले होते. 

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याCourtन्यायालयEnglandइंग्लंडIndiaभारत