UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:09 IST2025-10-30T18:58:39+5:302025-10-30T19:09:44+5:30
२४-२५ ऑक्टोबर रोजी ओहायोमधील राईट-पॅटरसन एअर फोर्स बेसवर तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ते मानवी क्षमता आणि शस्त्रास्त्र संशोधन यासारख्या गुप्त विभागांमध्ये सहभागी होते. याबाबत तपास सुरू आहे.

UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
अमेरिकेतील ओहायो येथील राईट-पॅटरसन हवाई दल तळावर २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी तीन हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांचा अचानक मृत्यू झाला. या तिघांचा मृत्यू एक साधा अपघात वाटू शकतो पण पण यामध्ये वेगळाच संशय व्यक्त करण्यात आला आहे. या तळावरील UFO च्या गोष्टींमुळे कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
राईट-पॅटरसन हवाई दल तळाच्या अधिकाऱ्यांनी २८ ऑक्टोबर रोजी एक निवेदन प्रसिद्ध केले, हे तिनही संशोधक तळावर काम करत होते, असे यामध्ये सांगितले आहे. या तिघांची नावे फर्स्ट लेफ्टनंट जेमी गुस्टिटास (२५), जेमी प्रिचर्ड (३३), कब प्रिचर्ड (३४) अशी आहेत.
पोलिसांच्या तपासानुसार, हे मृत्यू दुहेरी हत्या-आत्महत्या असल्याचे दिसून येते. वेस्ट मिल्टन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास जेकब प्रिचर्डने त्याची पत्नी जेमीची हत्या केली. त्यानंतर त्याने जेमीचा मृतदेह त्याच्या कारच्या ट्रंकमध्ये ठेवला. सहकारी जेमी गस्टिट्सच्या अपार्टमेंटमध्ये घुसले आणि गस्टिट्सवर गोळीबार केला. त्यानंतर जेकबने स्वतःवर गोळी झाडली. त्याचा मृतदेह कारजवळ सापडला.
ओहायो ब्युरो ऑफ क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आणि एअर फोर्स ऑफिस ऑफ स्पेशल इन्व्हेस्टिगेशन्स तपास करत आहेत. जेकबने असे का वागले याबद्दल अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. याबाबत अनेकांना धक्का बसला आहे. ह्युबर हाइट्स आणि शुगरक्रिक टाउनशिपमधील रहिवासी या घटनेला खूपच त्रासदायक म्हणत आहेत. घटना बेसच्या बाहेर घडली, परंतु तिन्ही कर्मचारी प्रमुख विभागांचे होते.
रोझवेल यूएफओ कनेक्शन
राईट-पॅटरसन बेस हा यूएफओ कथांचा केंद्रबिंदू राहिला आहे. १९४७ मध्ये, न्यू मेक्सिकोतील रोझवेल येथे एक यूएफओ कोसळल्याची अफवा पसरली होती. त्याचे अवशेष आणि तीन फूट लांबीच्या, राखाडी एलियनचे अवशेष हँगर १८ मध्ये लपलेले होते. तेथे गुप्त संशोधन केले जाते, जसे की मानवांना अतिमानवांमध्ये रूपांतरित करण्यासाठी एलियन तंत्रज्ञानाचा वापर करणे, असे लोकांचे मत होते.