जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही थांबलेला नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनांशिवाय लसीकरणदेखील महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेक देशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक वेगवान केली आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लसीचं उत्पादन केलं. यामध्ये चीनचाही समावेश होता. चीननं कोरोनाचा सामना करण्यासाठी सायनोफार्म (Sinopharm) नावाची लस तयार केली. ब्लूमबर्गनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीनं चीनकडून या लसी घेऊन देशात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. परंतु या लसीचे दोन डोस दिल्यानंतरही ज्यांनी ही लस घेतली त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयारच झाल्या नाहीत. अशा परिस्थितीच संयुक्त अरब अमिरातीमध्ये तिसरा डोस देण्याची तयारी केली जात आहे. द नॅशनल न्यूज पेपरमध्ये मार्च महिन्यात प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार काही अशा लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात आला ज्यांच्यामध्ये दोन डोसनंतरही अँटीबॉडीजच तयार झाल्या नाहीत. चीनच्या लसीत्या क्षमतेवरही आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या इमरजन्सी क्रायसिस अँड डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीनं (National Emergency Crisis and Disaster Management Authority) ज्या लोकांनी या लसीचे दोन डोस घेतले त्यांच्यासाठी तिसरा डोस उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये तिसरा डोस अशा व्यक्तींना देण्यात आला ज्यांच्यामध्ये दोन डोसनंतरही अँटीबॉडीज तयारच झाल्या नाहीत. तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेनं या लसीच्या क्षमतेवर दावा करत ती ७९ टक्के प्रभावी असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमघ्ये आतापर्यंत १ कोटी १५ लाख लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये फायझर आणि अॅस्ट्राझेनकाची लसही दिली जात आहे. परंतु मोठ्या प्रमाणात चिनी लस देण्यात येत आहे. सेशेल्समध्येही ६० टक्के नागरिकांना सायनोफार्मची लस देण्यात आली आहे. परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे.
चीनच्या Corona Vaccine नं दिला धोका; UAE मध्ये नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 14:59 IST
Coronavirus Vaccine : संयुक्त अरब अमिरातीनं सायनोफार्मचे तीन डोस देण्याची दिली परवानगी. चीनच्या लसीनं दिला संयुक्त अरब अमिरातीला धोका.
चीनच्या Corona Vaccine नं दिला धोका; UAE मध्ये नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी
ठळक मुद्देसंयुक्त अरब अमिरातीनं सायनोफार्मचे तीन डोस देण्याची दिली परवानगी.चीनच्या लसीनं दिला संयुक्त अरब अमिरातीला धोका.