शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

यूएईकडून मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान; 'झाएद पदका'नं गौरव होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 1:17 PM

द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल

नवी दिल्ली: संयुक्त अरब अमिरातकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'झाएद पदका'नं सन्मान करण्यात येणार आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जाणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील संबंध एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले. यामध्ये मोदींचा मोठा वाटा असल्यानं त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आल्याची माहिती अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद यांनी ट्विट करुन दिली. याआधी महाराणी एलिजाबेथ, जॉर्ज डब्ल्यू बुश, व्लादिमीर पुतिन, निकोलस सरकोजी, क्षी जिनपिंग आणि अँजेला मर्केल यांना 'झाएद पदका'नं गौरवण्यात आलं आहे. संयुक्त अरब अमिरातकडून दिलं जाणारं 'झाएद पदक' बहुतांशवेळा पी-5 देशांच्या प्रमुखांना दिलं गेलं आहे. पी-5 मध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश होतो. मात्र आता या राष्ट्रप्रमुखांच्या यादीत मोदींच्या नावाचा समावेश झाला आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाल्यानं हा सन्मान मोदींना दिला जात असल्याचं यूएईनं म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापारी आणि सामरिक संबंध अधिक घनिष्ठ झाले आहेत. विविध क्षेत्रांमधील सहकार्यदेखील वाढीस लागल्याचा उल्लेख यूएईनं केला आहे. याआधी फेब्रुवारीत मोदींचा सेऊल शांतता पुरस्कारानं गौरव करण्यात आला. दक्षिण कोरियाकडून हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारानं सन्मानित होणारे ते पहिले भारतीय ठरले. आर्थिक आणि ऍक्ट ईस्ट धोरणांसाठी दक्षिण कोरियाकडून मोदींचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे 130 कोटी देशवासीयांचा सन्मान असल्याची भावना मोदींनी बोलून दाखवली होती. संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान आणि बान की मून यांचा मोदींआधी हा पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती