Pakistan Helicopter Crash: पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 20:37 IST2021-12-06T20:37:15+5:302021-12-06T20:37:38+5:30
काराकोरम पर्वतरांगांमध्ये सियाचिन ग्लेशिअर 1984 पासून भारत-पाकिस्तानमध्ये वादाचा मुद्दा राहिला आहे.

Pakistan Helicopter Crash: पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट ठार
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये दोन पायलट ठार झाले आहेत. ही माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
हेलिकॉप्टर दुर्घटनेत ठार झालेल्या पायलटांचे नाव मेजर इरफान बेरचा आणि मेजर राजा झीशान असे आहे. पाकिस्तानी सैन्याचे जवान आणि मदत कार्यासाठी हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहे.
Two Pak Army pilots killed in helicopter crash at Siachen in Gilgit-Baltistan: Pak Army
— ANI (@ANI) December 6, 2021
काराकोरम पर्वतरांगांमध्ये सियाचिन ग्लेशिअर 1984 पासून भारत-पाकिस्तानमध्ये वादाचा मुद्दा राहिला आहे.