ह्रदय शस्त्रक्रिया झालेल्या दोन महिन्याच्या बाळाने दिलेल्या स्माईलचं जगाने केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 03:52 PM2018-01-08T15:52:58+5:302018-01-08T16:03:25+5:30

या चिमुकल्यावर इतक्यातच एक ह्रदय शस्त्रक्रिया झाली आहे मात्र त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल त्याचं सगळं दु:ख विसरायला लावणारी आहे.

two months old baby boy smile after heart surgerry is heart winning on social media | ह्रदय शस्त्रक्रिया झालेल्या दोन महिन्याच्या बाळाने दिलेल्या स्माईलचं जगाने केलं कौतुक

ह्रदय शस्त्रक्रिया झालेल्या दोन महिन्याच्या बाळाने दिलेल्या स्माईलचं जगाने केलं कौतुक

Next
ठळक मुद्देइंग्लडमध्ये दोन महिन्याच्या या चिमुकल्यावर ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.यु.के.मधील ही शस्त्रक्रिया होणारा तो सगळ्यात चिमुकला ठरला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदाच तो आईकडे पाहून हसला आणि ती स्माईल सर्वांचं मन जिंकणारी ठरली. 

इंग्लड : इंग्लडच्या न्यू कॅसल शहरात दोन महिन्याच्या चार्ली डाऊथवॅथ या चिमुकल्यावर ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यु.के.मधील ही शस्त्रक्रिया होणारा तो सगळ्यात चिमुकला ठरला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या चिमुकल्याने आपल्या आईकडे बघून जेव्हा स्माईल दिली तेव्हा सगळ्यांनाच आनंद  झाला. कारण जन्माला आल्यानंतर हा चिमुकला पहिल्यांदाच हसला होता. 

दि सन या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या चिमुकल्याची आई ट्रेसी राइट हिला बाळाचे फोटो काढण्याची प्रचंड आवड होती. तिच्या मते दरदिवशी बाळाची वाढ होत राहते. ही वाढ  फोटो रुपात कैद करण्यासाठी ती रोज बाळाचे फोटो काढत होती. बाळाचा जन्म ऑक्टोबर महिन्यात झालाय. जन्माच्या वेळीस बाळाचं वजन ३ किलो होतं. तो तीन दिवसांचा होता त्याच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. त्याच्या शरीराचा डावा भाग विकसित न झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत होती. त्यानंतर त्याच्यावर ह्रदय प्रत्यारोपणाचीही शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानुसार डॉक्टरांनी अवयव दान करणाऱ्या दात्यांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांना एक ह्रदय मिळालं आणि बाळाची ह्रदय प्रत्यारोपण यशस्वी झाली.

अवघ्या दुसऱ्या महिनातच या बाळावर एवढी मोठी शस्त्रक्रिया झाल्याने सगळेच चिंतेत होते. त्याच्या नाकापासून पायापर्यंत लावलेल्या नळकांड्या पाहून कोणालाही या बाळाची दयाच येईल. मात्र त्याच्या आई-वडिलांनी आशा सोडली नव्हती. यु.केमधील तो पहिला बाळ ठरलाय ज्याच्यावर ए‌वढ्या लहान वयात ह्रदय प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया झालीय. १४ आठवड्यांनंतर चार्ली व्यवस्थित होऊ लागला. त्याची आई त्याचे फोटो काढत असताना हसत होती, त्यामुळे त्या चिमुल्यानेही छानशी स्माईल दिली. ही स्माईल पाहून तिचा आनंदच गगनात मावत नव्हता. हा फोटो तिने सोशल साईटवर टाकला असता क्षणार्धात व्हायरल झाला. या बाळाला खऱ्या अर्थाने लोक योद्धा (सर्व्हायव्हर) असं संबोधू लागले आहेत. दरम्यान, बाळाच्या आईने ह्रदयदान करणाऱ्या दात्यांचे मनापासून आभार मानले आहेत. आयुष्यातील सगळ्यात मोठं गिफ्ट मिळाल्याच्या भावना व्यक्त करत त्यांनी दात्यांचे आभार मानले.

Web Title: two months old baby boy smile after heart surgerry is heart winning on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.