बर्लिन - दुसरे महायुद्ध संपून जवळपास 75 वर्षे होत आली आहेत. मात्र या युद्धाच्या आठवणी ताज्या करणाऱ्या अनेक खाणाखुणा अजूनही युरोपमध्ये दिसून येतात. दरम्यान, जर्मनीमधील डॉर्टमुंड शहरात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तयार करण्यात आलेला भलामोठा बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली. बॉम्ब सापडल्याचे वृत्त शहरात पसरताच लोक आपला जीव वाचवण्यासाठी घरदार सोडून पळू लागले. जर्ममीच्या पश्चिम भागात असलेल्या डॉर्टमुंट येथे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील चार बॉम्ब सापडले आहेत. यापैकी प्रत्येक बॉम्बचे वजन सुमारे 250 किलो आहे. दरम्यान, बॉम्ब सापडल्याचे वृत्त समजताच सुरक्षा यंत्रणांनी हे बॉम्ब ताब्यात घेऊन ते निष्क्रिय केले.
या शहरात सापडले अडीचशे किलोचे बॉम्ब, घाबरलेल्या लोकांनी घरदार सोडून काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 16:09 IST