रशियातील दोन मेट्रो स्थानकांत स्फोट, 10 ठार, 20 जखमी
By Admin | Updated: April 3, 2017 22:42 IST2017-04-03T18:05:12+5:302017-04-03T22:42:47+5:30
रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील मेट्रो स्टेशनवर मोठा स्पोट झाला असून, या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला

रशियातील दोन मेट्रो स्थानकांत स्फोट, 10 ठार, 20 जखमी
ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. 3 - रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील दोन मेट्रो स्थानकांमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. सेंट पीटर्सबर्ग शहरातील सनाया स्क्वेअर या भूमिगत मेट्रो स्टेशनमध्ये हा स्फोट झाला आहे. रशियाचे राष्ट्पती ब्लादिमीर पुतीन शहरात असून, त्यांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या स्फोटांचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र रशियाचे राष्ट्रपती यांनी या स्फोटांमागील दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारलेली नाही.
स्फोटानंतर सोशल मीडियावर काही छायाचित्रे प्रसारित झाली असून, त्यात एका मेट्रोच्या डब्याचा दरवाजा स्फोटाने उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, या स्फोटांनंतर मेट्रो स्टेशनमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, स्फोटांनंतर खबरदारीचा उपाय म्हणून आठ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. दरम्यान या स्फोटात 10 जण मृत्युमुखी तर 20 जण जखमी झाल्याची माहिती रशियाच्या गव्हर्नरांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.