दोन कुत्र्यांनी घेतला मालकिणीचा बळी

By Admin | Updated: August 20, 2015 23:08 IST2015-08-20T23:08:32+5:302015-08-20T23:08:32+5:30

केनियात राहणाऱ्या ब्रिटिश एलिझाबेथ क्लैअर राईट यांचा त्यांनीच पाळलेल्या दोन कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. बुधवारी मलिंदा गावात राईट आपल्या

Two dogs have been the victim of the ownership | दोन कुत्र्यांनी घेतला मालकिणीचा बळी

दोन कुत्र्यांनी घेतला मालकिणीचा बळी

मोम्बासा : केनियात राहणाऱ्या ब्रिटिश एलिझाबेथ क्लैअर राईट यांचा त्यांनीच पाळलेल्या दोन कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. बुधवारी मलिंदा गावात राईट आपल्या घरी आल्यानंतर कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा ताबडतोब मृत्यू झाला. या घटनेची आम्ही चौकशी करीत आहोत. हे दोन कुत्रे राईट यांच्या पतीने मोकळे सोडलेले होते. एलिझाबेथ यांनी मुख्य दार उघडताच त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एलिझाबेथ यांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या होत्या व त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Two dogs have been the victim of the ownership