शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

जगभरातल्या दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक, CEO जॅक डोर्सी म्हणतात.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 8:34 AM

जेव्हा नेमकं हे कसं झालं हे कळेल, तेव्हा नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू, असंही जॅक डोर्सी म्हणाले आहेत. 

ओबामा, नेत्यान्याहूंसह जो बिडेन, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या कालावधीत हॅकर्सनी एक लाखांहून अधिक डॉलर्स कमावले आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्सी यांनी एक निवेदन जारी केले की, आमच्यासाठी एक कठीण दिवस आहे. जे काही घडले ते खरोखरच भयानक आहे. याचं समाधान आम्ही शोधणार असून, त्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करणार आहोत. जेव्हा नेमकं हे कसं झालं हे कळेल, तेव्हा नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू, असंही जॅक डोर्सी म्हणाले आहेत.

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क, अमेरिकेचे रॅपर कान्ये वेस्ट, अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बिडेन, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, इस्त्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, वॉरेन बफे, ऍपल, उबरसह अन्य ट्विटर खाती हॅक करण्यात आली आहेत. ट्विटर पोस्टमध्ये बिटकॉइनच्या माध्यमातून मागितले पैसे बिल गेट्सच्या खात्यातून ट्विट केले की, 'प्रत्येक जण मला परत येण्यास सांगत आहे, आता ती वेळ आली आहे. तुम्ही मला BTC पत्त्यावर एक हजार डॉलर्स पाठवा आणि मी तुम्हाला दोन हजार डॉलर्स करून देईन. ही ऑफर केवळ 30 मिनिटांसाठी उपलब्ध आहे. अशी पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्ये ही ट्वीट अकाऊंटवरून हटवण्यात आली. या दिग्गज व्यक्तींच्या अकाऊंटवर हा मेसेज कोणी केला याबाबत अद्याप समजलेलं नाही. टेस्ला प्रमुख एलॉन मस्क यांचं खातं हॅक करून पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मला बिटकॉइन्स द्या आणि मी तुम्हाला ते दुप्पट करून देईन. पुढच्या एका तासासाठी ही ऑफर आहे. बिटकॉइन पत्त्याच्या लिंकसह ट्विट केले आहे. कोरोना महारोगराईमुळे मी दान करत आहे. ही ट्विट काही मिनिटांत हटवण्यात आलीअमेरिकेचे प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्ट यांच्या व्यतिरिक्त माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन, जगातील सर्वात मोठी कंपन्या उबर आणि ऍपल यांची खातीही हॅक करण्यात आली. अल्पावधीतच शेकडो लोकांनी हॅकर्सना दहा लाखांहून अधिक डॉलर्स पाठविले. ज्या खात्यास लक्ष्य केले होते, त्या खात्यात लाखो अनुयायी आहेत. ट्विटरने म्हटले आहे की, ते घटनेचा तपास करीत आहेत आणि लवकरच याबाबतचे विधान प्रसिद्ध केले जाईल.

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूTwitterट्विटर