Turkey giving big blow to Pakistan; Turkey, India look to revitalise ties as US changes Afghan strategy | पाकिस्तान रडणार! 'दोस्त दोस्त ना रहा...'; तुर्की सख्ख्या मित्राची साथ सोडून भारताच्या वाटेवर

पाकिस्तान रडणार! 'दोस्त दोस्त ना रहा...'; तुर्की सख्ख्या मित्राची साथ सोडून भारताच्या वाटेवर

जम्मू-काश्मीरचा अनुच्छेद 370 रद्द केल्याने भारत आणि तुर्कस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा तनाव आता निवळू लागला असून तुर्की पाकिस्तानची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वात तुर्की अफगाणिस्तानमध्ये शांतता चर्चेसाठी तयार झाला आहे. (Tensions between Indian and Turkey had heightened after Modi govt scrapped Article 370 in J&K in August 2019.)


पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 मध्ये काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द करून टाकला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. याला तुर्कीनेदेखील पाठिंबा दिला होता. यामुळे तुर्की पाकिस्तानचा समर्थक असल्याचे मानले जात होते. आता भारत आणि तुर्कीमध्ये संबंध सुधारत असून हा पाकिस्तानला धक्का मानला जात आहे. 


रविवारी तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याची निंदा केली. या आधीही  तुर्कीने अशाप्रकारे दु:ख व्यक्त केले होते. परंतू रविवारचे वक्तव्य खूप महत्वाचे आहे. कारण भारतातील अंतर्गत सुरक्षेसंबंधी घटनेवर तुर्की बोलला आहे. नक्षलवादी आणि दहशतवादी हे दोन्ही मुद्दे सारखेच आहेत. दोन्ही गट भारताविरोधात कटकारस्थाने रचत असतात. यामुळे पाकिस्तानला तुर्कीने एकप्रकारे संकेत दिले आहेत. 


गेल्याच आठवड्याच तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवलुथ औसुओग्लू यांनी ताजिकीस्तानमध्ये एका सम्मेलनात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था आणि व्यापारावर लक्ष देण्यासोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर जोर दिला होता. ते 29 मार्चला भेटले होते. 
नवी दिल्ली आणि अंकारामध्ये तेव्हा तणावाचे वातावरण होते. जम्मू काश्मीरचा अनुच्छेद 370 रद्द केल्याने तुर्कीचे पंतप्रधान एर्दोगन यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. तसेच पाकिस्तानसोबतच्या तणावावर तोडगा काढण्याचे वक्तव्य केले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीचा नियोजित दौरा रद्द केला होता. 


फेब्रुवारी 2020 मध्ये एर्दोगन यांनी पाकिस्तान दौऱ्यावेळी काश्मीर मुद्द्याचे इस्लामाबादच्या बाजुने समर्थन केले होते. तसेच दुसऱ्या विश्वयुद्धातील आपल्या देशाच्या परिस्थितीची तुलना त्यांनी सध्याच्या काश्मीरसोबत केली होती. यावर भारताने तुर्कीला चोख प्रत्यूत्तर दिले होते. निवडणुका असल्याने असली वक्तव्ये त्यांना करावी लागतात. त्यांची स्वत:ची काहीतरी मजबुरी असेल असे भारताच्या तुर्कीतील माजी  राजदुतांनी सुनावले होते. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Turkey giving big blow to Pakistan; Turkey, India look to revitalise ties as US changes Afghan strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.