व्हिसावरून ट्रम्प यांचे तळ्यात-मळ्यात

By Admin | Updated: March 5, 2016 02:38 IST2016-03-05T02:38:33+5:302016-03-05T02:38:33+5:30

विदेशी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या व्हिसावरून ट्रम्प यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे सर्वात प्रबळ दावेदार म्हणून

In the trunk of the trip | व्हिसावरून ट्रम्प यांचे तळ्यात-मळ्यात

व्हिसावरून ट्रम्प यांचे तळ्यात-मळ्यात

नवी दिल्ली : विदेशी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या व्हिसावरून ट्रम्प यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे सर्वात प्रबळ दावेदार म्हणून पुढे आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदर म्हटले आहे की, एच-१ बी व्हिसाबाबत मी माझी भूमिका लवचिक केली आहे; पण पुन्हा त्यांनी सांगितले की, जर मी अध्यक्ष झालो तर हा व्हिसा कार्यक्रमच बंद करू.
भारतासारख्या देशातून मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअर तज्ज्ञ अमेरिकेत जातात. हा व्हिसा भारतीयांत लोकप्रिय आहे. अमेरिकी कंपन्या या व्हिसावर भारतीयांना नोकरीसाठी आमंत्रित करतात. याच व्हिसावरून ट्रम्प यांनी ही परस्परविरोधी वक्तव्ये केली आहेत.

Web Title: In the trunk of the trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.