ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बने चीनमध्ये खळबळ, समुद्रातच माल सोडून पळून जातायत ड्रॅगनचे एक्सपोर्टर्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:24 IST2025-04-09T16:22:19+5:302025-04-09T16:24:27+5:30
इंडस्ट्रीचे लोक याला "लाँग मार्चची तयारी" म्हणत आहेत, म्हणजेच एक दीर्घ आणि खडतर आर्थिक मंदीचा सामना...

ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बने चीनमध्ये खळबळ, समुद्रातच माल सोडून पळून जातायत ड्रॅगनचे एक्सपोर्टर्स!
आता अमेरिका आणि चीन यांच्यात जबरदस्त व्यापार युद्ध सुरू झाले आहे. यातच काही चीनी एक्सपोर्टर्सनी (निर्यातदार) मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेने लादलेल्या तगड्या टॅरिफपासून वाचण्यासाठी, ते समुद्र प्रवासादरम्यानच आपला माल अर्ध्यावर सोडून, कंटेनर शिपिंग कंपन्यांना सोपवत आहेत. इंडस्ट्रीचे लोक याला "लाँग मार्चची तयारी" म्हणत आहेत, म्हणजेच एक दीर्घ आणि खडतर आर्थिक मंदीचा सामना...
एका दिवसात केवळ 3 ते 6 कंटेनर -
साऊथ चायना पोस्टने दिलेल्या एका वृत्तानुसार, चीनमधील एका लिस्टेड कर्मचाऱ्याने म्हटले आहे की, ट्रम्प सरकाने लादलेल्या नव्या टॅरिफनंतर, त्यांची अमेरिकेतील
दैनंदिन शिपमेंट ४०-५० कंटेनरवरून केवळ ३-६ कंटेनरवर आली आहे. अमेरिकेने चिनी वस्तूंवर १०४ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादला आहे. यामुळे एकूण टॅरिफ आता ११५ टक्क्यांवर पोहोचला आहे. या नव्या टॅरिफमुळे बीजिंग चांगलाच संतापला आहे. याशिवाय, जागतिक बाजारपेठेतही खळबळ उडाली आहे. यामुळे व्यापार युद्ध भडकण्याची शकता निर्माण झाली आहे.
"समुद्रात पोहोचलेला मालही होतोय कॅन्सल" -
कंपनीच्या कर्मचाऱ्याने म्हटले आहे की, "आम्ही फिलीपिन्स, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि मलेशियातून येणारे सर्व शिपिंग रोखले आहे. कारखान्यांची ऑर्डर रद्द करण्यात आले आहेत. अद्याप लोड न झालेल्या वस्तू स्क्रॅप केल्या जात आहेत आणि समुद्रात असलेल्या वस्तूंची किंमत पुन्हा निश्चित केली जात आहे," असे कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले. एका क्लायंटने कंपनीला असेही सांगितले की तो समुद्रात आधीच पाठवलेला माल सोडून देत आहे आणि तो शिपिंग कंपन्यांना देत आहे कारण "जबाब लागू झाल्यानंतर कोणीही तो खरेदी करणार नाही."
सर्व फॅक्ट्री ऑर्डर रद्द झाल्या आहेत. जो माल अद्याप लोडही झाला नाही, तो स्क्रॅप करण्यात येत आहे. तसे जो समुद्रात आहे, त्याची नवी किंमत लावली जात आहे." यातच, आधीपासूनच समुद्रा मार्गात असलेला माल सोडत आहोत आणि शिपिंग कंपनीच्या स्वाधीन करत आहोत. कारण टॅरिफ लागल्यानंतर, तो कुणीही खरेदी करणार नाही, असे एका क्लाइंटने कंपनीला सांगितले. महत्वाचे म्हणजे, व्यापार युद्धापासून वाचण्यासाठी, चिनी एक्सपोर्टर्सनी आता अमेरिकेऐवजी युरोप आणि जपानकडे आपला मोर्चा वळवला आहे.