शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

खेळाच्या मैदानावरही ट्रम्प नावाची छाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 08:15 IST

जागतिक पातळीवर ज्या क्रीडा स्पर्धेची वाट बघितली जात आहे, त्याच्या आयोजनाआधीच सह-आयोजकांमध्ये दुफळी असल्याचे चित्र आहे. 

- अभिजित देशमुखमुक्त क्रीडा पत्रकार  मेरिका, कॅनडा, आणि मेक्सिकोने २०२६ फिफा वर्ल्ड कप सह-आयोजन करण्याचा ठराव जिंकला, तेव्हा खरे तर उत्तर अमेरिकेतील एकता जिंकल्याची भावना होती. पण, २०२५ उजाडल्यापासून खेळ आणि राजकारण यांचा अनोखा खेळ सुरू झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून या खेळाला नव्या नियमांनी घेरले आहे. जगातील सर्वांत मोठा खेळाचा कुंभमेळा अर्थात ऑलिम्पिक खेळ २०२६ मध्ये लॉस एंजलिसमध्ये होऊ घातले आहेत आणि त्यावर आता ट्रम्प नावाच्या वादळाची छाया आहे. 

संपूर्ण अमेरिका खंडात होणाऱ्या या स्पर्धेवर ब्युरोक्रसीच्या अडचणी, राजकीय अनिश्चितता आणि व्हिसा विलंबाची काळी किनार दिसू लागली आहे. ही स्पर्धा रोमांचक होण्याआधीच सह-आयोजक देशांमध्ये तणाव निर्माण होऊ लागला आहे. कॅनडाला यूएसचा ५१ वा देश बनवण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. मेक्सिकन सीमेवरून होणाऱ्या घुसखोरीविरोधात ट्रम्प यांनी लगाम लावायला सुरूवात केलेली आहे. 

मोफत प्रवास मिळेल?रशिया २०१८ एक चाहत्यांसाठी स्वप्नवत होते, कारण यजमान शहरांमधील रेल्वे प्रवास मोफत होता. २०२६ मध्ये काहीतरी तत्सम प्रयत्न केला जाऊ शकतो, अमेरिका मियामीपासून एलएपर्यंत या देशांतर्गत प्रवासासाठी सबसिडी देऊ शकतो. चाहत्यांना कॅनडा, अमेरिका व मेक्सिकोमधून मुक्तपणे प्रवास करण्यासाठी व्हिसा नियम व सीमा तपासण्या पार कराव्या लागतील.

व्हिसा मिळण्याची अडचण दूर होणार?यापूर्वी कतार २०२२ आणि रशिया २०१८ येथे झालेल्या स्पर्धांमध्ये मॅच तिकीट असले तरी व्हिसा मिळण्याची अडचण यायची नाही. चाहत्यांना स्पेशल आयडी मिळायचे, सुविधा मिळायच्या. यावेळ चित्र वेगळे आहे. २०२६ च्या फिफा वर्डकपसाठी जाता येईलच, याची शाश्वती नाही. कारण व्हिसा वेटिंग कालावधी मोठा आहे. कोलंबियातील चाहत्यांना व्हिसासाठी ६७० दिवस थांबावे लागते आहे. भारतात हाच कालावधी ४०० दिवसांच्या आसपास आहे. एवढेच नाही तर सह-आयोजक असलेल्या मेक्सिकोच्या लोकांनाही अमेरिकन व्हिसासाठी ४५८ दिवस प्रतीक्षेत राहावे लागत आहे. इंग्लंड, चीन, ब्राझिल आणि जर्मनीसारख्या अनेक देशांमध्येही वेटिंग कालावधी अधिक आहे. इराण फिफासाठी पात्र ठरला खरा पण राजकीय वॉरमध्ये तेथील चाहत्यांची अडचण होऊ लागल आहे. इराणची राजधानी तेहराणमध्ये अमेरिकन एम्बसी नाही. त्यामुळे इराणच्या चाहत्यांना तिसऱ्या देशांमधून व्हिसासाठी विनवण्या कराव्या लागणार आहेत.

ट्रम्पची वर्ल्ड कप टास्क फोर्सट्रम्पने २०२६ फिफा वर्ल्ड कपसाठी व्हाइट हाऊस टास्क फोर्स स्थापन केला आहे. स्वतः ट्रम्प त्याचे अध्यक्ष आहेत. हा टास्क फोर्स लॉजिस्टिक अडचणी दूर करू शकते, व्हिसा प्रक्रियेला गती देऊ शकते आणि चाहत्यांच्या गतीला समर्थन देऊ शकते. अमेरिकेने केवळ फिफा वर्ल्ड कपच नाही, तर २०२८ मधील समर ऑलिंपिक्सही लॉस एंजेलिसमध्ये आयोजित करण्याचा मान मिळवला आहे. ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात जगातील दोन सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. खेळामुळे देशांमधील तणाव दूर होतात. संबंध अधिक दृढ होतात. २०२६ मधील फिफा वर्ल्डकप आणि २०२८ मधील ऑलिम्पिक या स्पर्धाही तणाव दूर करतील.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प