आजपासून जगावर लागणार डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘जशास तसा’ कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 07:05 IST2025-04-02T07:04:48+5:302025-04-02T07:05:26+5:30
Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयाने बुधवार, २ एप्रिलपासून ‘जशास तसे’ कर लावण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘व्हाइट हाऊस’च्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी अमेरिकेकडून ‘जशास तसे’ कर लावण्याची हीच योग्य वेळ आहे, असे म्हटले.

आजपासून जगावर लागणार डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘जशास तसा’ कर
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयाने बुधवार, २ एप्रिलपासून ‘जशास तसे’ कर लावण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘व्हाइट हाऊस’च्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी अमेरिकेकडून ‘जशास तसे’ कर लावण्याची हीच योग्य वेळ आहे, असे म्हटले. बुधवारी अमेरिकन जनतेला खरा न्याय मिळेल. देशासाठी हा खरा मुक्ती दिवस असेल, असेही त्या म्हणाल्या. परंतु लेविट यांनी या शुल्काचे स्वरुप कसे असेल, किती देशांवर याचा परिणाम होईल, हे स्पष्ट केले नाही.
लेविट म्हणाल्या, भारत अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवर १०० टक्के शुल्क लावतो. यामुळे निर्यात करणे अमेरिकेला अशक्य झाले आहे.
भारत लवकरच करांमध्ये मोठी कपात करणार : ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला असे समजले की भारत आपल्या करांमध्ये मोठी कपात करणार आहे. हे कुणीतरी खूप आधीच करायला हवे होते. आता इतरही देश कर कमी करणार आहेत.