शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

"मित्राला पैसे देऊन, त्याला डमी म्हणून बसवून पास झाले डोनाल्ड ट्रम्प"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 3:35 PM

ट्रम्प यांची भाची मेरी ट्रम्पनं लिहिलेलं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. त्यातच आता ट्रम्प यांच्या भाचीचं पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्यात ट्रम्प यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा उल्लेख आहे. यातील काही दावे तर अतिशय धक्कादायक आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची भाची मेरी ट्रम्प यांचं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. 'ट्रम्प यांनी महाविद्यालयाची फसवणूक करून प्रवेश मिळवला. त्यांनी पैसे देऊन एकाला त्यांच्या जागी परीक्षेला बसण्यास सांगितलं. ट्रम्प त्यावेळी हायस्कूलमध्ये शिकत होते आणि त्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी चांगल्या गुणांची आवश्यकता होती,' असा दावा मेरी ट्रम्प यांनी केला आहे.मेरी ट्रम्प लिखित 'टू मच अँड नेव्हर इनफ: हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस मॅन' (Too Much and Never Enough: How My Family Created the World's Most Dangerous Man) पुस्तक २८ जुलैला प्रकाशित होणार होतं. मात्र आता ते १४ जुलैलाच प्रकाशित केलं जाणार आहे. मेरी ट्रम्प यांनी लिहिलेल्या पुस्तकाला मोठी मागणी असून लोकांना त्यामध्ये खूप रस आहे. त्यामुळे ते पुस्तक आधीच बेस्ट सेलरच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचलं असल्याची माहिती प्रकाशकांनी दिली आहे.विद्यापीठातील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत चांगले गुण मिळतील, असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांना नव्हता. त्यामुळे त्यांनी एकाला पैसे देऊन स्वत:च्या जागी परिक्षेला बसवलं, असा दावा मेरी ट्रम्प यांनी पुस्तकात केला आहे. ट्रम्प यांच्याकडे पेन्सिल्वेनिया विद्यापीठाच्या प्रख्यात वोर्टन बिझनेस स्कूलची पदवी आहे. मेरी यांनी केलेले दावे व्हाईट हाऊसनं फेटाळून लावले आहेत. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका