शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प-किम भेट; उत्तर कोरियाचे नेते सिंगापूरमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 12:17 IST

किम जोंग उन यांच्या अगदी जवळचे नेते सिंगापूर येथे सोमवारी रात्री दाखल झाले आहेत.

सिंगापूर- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची 12 जून होणारी सिंगापूर भेट आता होण्याची चिन्हे दिसत आहे. उत्तर कोरियासंदर्भात काल डोनल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केल्यावर या भेटीची शक्यता अधिक ठळक झाली होती. त्याचबरोबर अमेरिकन शिष्टमंडळ प्योंगयांग येथे पोहोचले होते. आता किम जोंग उन यांच्या अगदी जवळचे नेते सिंगापूर येथे सोमवारी रात्री दाखल झाले आहेत. याबाबत जपानची सरकारी वृत्तवाहिनी एनएचकेने वृत्त प्रसारित केले आहे. किम चांग सन हे बीजिंगमार्गे सिंगापूरमध्ये सोमवारी रात्री दाखल झाले.

याबरोबरच अमेरिकन सरकारमधील अधिकारी, व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ फॉर ऑपरेशन्स जोए हॅगिनसुद्धा अमेरिकेच्या योकोटा एअरबेसवरुन सिंगापूरला पोहोचले आहेत.गेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन यांची भेट घेतली होती. त्यामुळे कोरियन द्वीपकल्पातून अण्वस्त्रे हद्दपार करण्याचा निर्णय घेतला होता.  गेल्या आठवड्यात उत्तर कोरियातील अणू चाचणी केंद्राला काही परदेशी पत्रकार भेट देण्यासाठी गेले होते. अणू कार्यक्रम हळूहळू थांबवत असल्याच्या उत्तर कोरियाच्या घोषणेनंतर तेथिल सध्यस्थिती पाहाण्यासाठी हे पत्रकार पोहोचले होते. मात्र अमेरिकन लष्कराबरोबर सराव केल्यामुळे दक्षिण कोरियन पत्रकारांना तेथे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. उत्तर कोरियन सरकारने मर्य़ादित स्वरुपात या अणुचाचणी स्थळाला भेट देण्याची परवानगी दिली. भूमिगत चाचण्या आणि इंटरकॉन्टीनेन्टल बॅलिस्टीक मिसाइलच्या चाचण्या थांबवू असे आश्वासन उ. कोरियाने दिले होते. द. कोरियाने अमेरिकन लष्कराबरोबर युद्धसराव केल्यामुळे उत्तर कोरियाने नुकतेच प्रस्थापित झालेले उच्च स्तरिय संबंध गोठवले. त्यामुळे या पत्रकारांच्या चमूमध्ये द. कोरियन पत्रकारांचा समावेश नाकारण्यात आला होताय उ. कोरियात आलेल्या पत्रकार बीजिंगमधून एका चार्टर्ड विमानातून आले. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड आणि चीन, रशिया या देशांतील पत्रकारांमध्ये समावेश होता. 

टॅग्स :Kim-Trump Summit Singaporeकिम-ट्रम्प भेट सिंगापूरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पKim Jong Unकिम जोंग उनUSअमेरिका