बायडेन यांना मारण्याच्या इराद्याने व्हाइट हाउसजवळ धडकविला ट्रक; भारतीय वंशाच्या तरुणाचे कृत्य, पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 06:22 IST2023-05-25T06:22:14+5:302023-05-25T06:22:36+5:30
हल्लेखोर सेंट लुइसहून विमानाने सुमारे एक हजार किलोमीटर दूर असलेल्या डल्लासला आला होता.

बायडेन यांना मारण्याच्या इराद्याने व्हाइट हाउसजवळ धडकविला ट्रक; भारतीय वंशाच्या तरुणाचे कृत्य, पोलिसांनी केली अटक
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे निवासस्थान व्हाइट हाउसजवळील बॅरिअरवर भारतीय वंशाच्या युवकाने (वय १९) ट्रक धडकविला. साई वर्शिथ कंदूला असे त्याचे नाव आहे. बायडेन यांना ठार मारून सत्ता काबीज करण्याचा इरादा होता, अशी कबुली त्याने दिली. त्याच्या बॅगेवर स्वस्तिक चिन्ह असलेल्या ध्वजाचे चित्र होते. नाझी विचार मला पटतात, असे त्याने म्हटले आहे.
हजार किमी विमान प्रवास, ट्रक भाड्याने घेतला
हल्लेखोर सेंट लुइसहून विमानाने सुमारे एक हजार किलोमीटर दूर असलेल्या डल्लासला आला होता. त्याने सोमवारी रात्री एक ट्रक भाड्याने घेतला. व्हाइट हाउसच्या नजीक एका बॅरिअरला दोनदा धडक दिली. पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली.