शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:27 IST

भारत सरकारने फरारी दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. कॅनेडियन बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सीच्या एका अधिकाऱ्याचे नाव या यादीत आहे.

गेल्या काही दिवसापासून भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढला आहे. आता भारत सरकारने फरारी दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कॅनेडियन बॉर्डर सर्व्हिस एजन्सीच्या अधिकाऱ्याचे नाव आहे.  या अधिकाऱ्याच्या फोटो आणि नावासही ही यादी भारताने ट्रुडो सरकारला पाठवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप सिंह सिद्धू हे प्रतिबंधित इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचे सदस्य आहेत आणि CBSA साठी काम करत आहेत. सिद्धूवर पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.

हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...

बलविंदर सिंह सिद्धूच्या हत्येसाठी संदीप सिंह सिद्धू पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी लखबीर सिंह रोडे याच्या संपर्कात होता.

बलविंदर सिंह सिद्धू यांनी १९९० च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवादाशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बलविंदर सिंह सिद्धू यांना दहशतवादाविरुद्ध लढा दिल्याबद्दल शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांच्या घरातच त्यांची हत्या करण्यात आली होती.

बलविंदर सिंह संधू यांच्या हत्येच्या कटात सुखमीत पाल सिंह उर्फ ​​सनी टोरंटो आणि लखवीर सिंह उर्फ ​​रोडे याचा सहभाग असल्याचा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने केला आहे. या हत्येनंतर संदीप सिंह सिद्धू यालाही CBSA मध्ये अधीक्षक पदावर बढती मिळाली आहे.

दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारत सरकारचे अधिकारी सामील असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. त्याचबरोबर भारताने कॅनडाचा हा दावा निराधार असल्याचे म्हटले आहे. ट्रुडो आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत.

१८ जून २०२३ रोजी सायंकाळी ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील गुरुद्वारातून बाहेर आल्यावर निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. २०२० मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले होते.

टॅग्स :CanadaकॅनडाJustin Trudeauजस्टीन ट्रुडो