शरीरशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; तीन शास्त्रज्ञांच्या नावाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 16:06 IST2019-10-07T15:46:15+5:302019-10-07T16:06:27+5:30

नोबेल पुरस्कार समितीकडून तीन शास्त्रज्ञांची नावं जाहीर

Trio Wins Nobel Prize In Physiology Or Medicine For Work On Cell Metabolism | शरीरशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; तीन शास्त्रज्ञांच्या नावाची घोषणा

शरीरशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; तीन शास्त्रज्ञांच्या नावाची घोषणा

नवी दिल्ली: यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. वैद्यकशास्त्र विभागात तीन शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर झाला आहे. विल्यम जी. केलिन ज्युनियर, सर पीटर जे. रॅटक्लिफ आणि ग्रेग एल. सेमेंजा या तिघांना संयुक्तपणे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात येणार आहे. पेशींकडून ग्रहण करण्यात येणाऱ्या ऑक्सिजनचा शोध लावल्यानं या शास्त्रज्ञांचा गौरव होणार आहे. 



नोबेल पुरस्कार समितीनं शरीरशास्त्रातील पुरस्कारासंबंधीची माहिती ट्विट करुन दिली. यंदा तीन जणांना संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर झाला. पेशींची कार्यपद्धती आणि त्यांच्याकडून केलं जाणारं ऑक्सिजन ग्रहण याविषयी केलेल्या संशोधनासाठी तिन्ही वैज्ञानिकांना नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराबद्दल सर पीटर जे. रॅटक्लिफ यांनी आनंद व्यक्त केला. पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी ते ईयू सिनर्जी ग्रँट ऍप्लिकेशनमधील त्यांच्या डेस्कवर काम करत होते.

कोण आहेत पुरस्कारविजेते?
अमेरिकन शास्त्रज्ञ विल्यम जी. केलिन ज्युनियर यांचा जन्म १९५७ मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला. त्यांनी डरहम विद्यापीठातून एमडीची पदवी घेतली आहे. बाल्टिमोर के. जॉन हॉपकिंग्स विद्यापीठ आणि बोस्टनच्या दाना-फार्बर कर्करोग संस्थेतून त्यांनी इंटर्नल मेडिसीन आणि ऑन्कोलॉजीमध्ये विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. 

सर पीटर जे. रॅटक्लिफ यांचा जन्म इंग्लंडमधील लँकशायरमध्ये १९५४ मध्ये झाला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या गोन्विले आणि साइअस महाविद्यालयातून औषधांचा अभ्यास केला आहे. यासोबतच त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून नेफ्रोलॉजीचं प्रशिक्षण घेतलं आहे.

ग्रेग एल. सेमेंजादेखील न्यूयॉर्कचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १९५६ साली झाला. त्यांनी हावर्ड विद्यापीठातून बायोलॉजी विषयामधून पदवी घेतली आहे. याशिवाय त्यांनी पेन्सिवेनिया विद्यापीठातून त्यांनी एमडी/पीएचडीदेखील घेतली आहे. 

Web Title: Trio Wins Nobel Prize In Physiology Or Medicine For Work On Cell Metabolism