भूकंपाच्या जबरदस्त धक्यानं इटली हादरलं
By Admin | Updated: October 30, 2016 18:00 IST2016-10-30T18:00:48+5:302016-10-30T18:00:48+5:30
इटली रविवावरी भूकंपाच्या जबरदस्त धक्याने हादरलं. रिश्टर स्केलवर 6.6 इतकी भूकंपाची तीव्रता होती. भूकंपामुळे अनेक इमारतींना मोठं नुकसान

भूकंपाच्या जबरदस्त धक्यानं इटली हादरलं
ऑनलाइन लोकमत
रोम, दि. 30 - इटली रविवावरी भूकंपाच्या जबरदस्त धक्याने हादरलं. रिश्टर स्केलवर 6.6 इतकी भूकंपाची तीव्रता होती. भूकंपामुळे अनेक इमारतींना मोठं नुकसान झालं असून काही इमारतींची पडझड झाल्याचंही वृत्त आहे. सुदैवाने कोणत्याही जिवीतहानीचं वृत्त अद्याप नाही, मात्र येथील सरकराने नागरिकांना खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.
सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी मध्य इटलीला भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती यूरोपीयन मेडिटेरियन सीस्मोलोजिकल सेंटरने दिली. भूकंपाचं केंद्र रोमपासून 132 किमीवर असल्याचं वृत्त आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या भूकंपाच्या जवळच भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भूकंपात येथे जवळपास 300 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण बेघर झाले होते.