शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

बुडालेल्या जहाजात 1.66 लाख कोटी डॉलर्सचा खजिना; ३१६ वर्षांपूर्वी बुडालेले जहाज कोलंबिया सरकार बाहेर काढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 7:38 AM

कोलंबिया खजिना शोधणार, तब्बल सव्वा तीनशे वर्षे समुद्रात बुडालेला

बोगोटा : सुमारे ३१६ वर्षांपूर्वी अटलांटिक महासागरात बुडालेल्या सॅन जोस या स्पॅनिश जहाजातील खजिना वर काढण्यासाठी कोलंबिया सरकारने पाण्याखाली शोध सुरू करणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. सध्या हे जहाज दोन हजार फूट इतक्या खोलीवर आहे.

शोधकार्यासाठी सरकार एक रोबोटही समुद्रात पाठवणार आहे. विशेष म्हणजे या जहाजात सोन्याची नाणी, दागिने आदी स्वरूपात तब्बल १.६६ लाख कोटी डॉलर्सचा खजिना आहे. त्यामुळे कोलंबियन नौदलाच्या देखरेखीखाली ही मोहीम चालणार आहे. 

रोबोटही पाठविणारशोधमोहिमेत पाठवल्या जाणाऱ्या रोबोटवर नोंदी घेण्यासाठी कॅमेरेही लावले जाणार आहेत. रोबोट उपग्रहाशी जोडलेला असेल. या मोहिमेवर सरकार अंदाजे ३७ कोटी रुपये खर्च करणार आहे. २०२४ च्या उत्तरार्धात ही मोहीम सुरू होईल. कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो म्हणाले की, जहाजाचे अवशेष जपून ठेवण्यासाठी सरकार खास प्रयोगशाळा तयार करणार आहे. अभ्यासानंतर ते राष्ट्रीय संग्रहालयात हलविण्यात येणार आहे.

कधी आणि कसे बुडाले? nसॅन जोस हे ६२ तोफा घेऊन निघाले होते. ८ जून १७०८ रोजी जहाज बुडाले. हे जहाज अमेरिकेतून स्पेनला खजिना घेऊन निघाले होते. स्पेन या खजिन्याचा वापर इंग्लंडविरोधात करणार nपरंतु, प्रवासादरम्यान इंग्लंडच्या सैनिकांनी हे जहाज ताब्यात घेतले. दागिन्यांसह जहाजातील सर्व सामान इंग्लंडचे सरकार ताब्यात घेणार होते. परंतु, त्याआधीच जहाजावर असलेल्या पावडरचा स्फोट झाला आणि जहाज बुडाले.

जहाजात काय होते?बुडाले तेव्हा या जहाजात २०० टन सोने आणि चांदीसह १ लाख ६६ हजार कोटी डॉलर्सचा खजिना होता. १७०८ साली हे जहाज राजे फिलिप पाचवे यांच्या ताफ्यात होते. जहाज बुडाले त्यावेळी जहाजावर ६०० लोक होते, त्यापैकी फक्त ११ जण जिवंत राहिले होते. २०१५ मध्येच कोलंबिया सरकारला या जहाजाचे अवशेष सापडले होेते. जहाजाच्या अवशेषात सोन्याची नाणी-विटा आणि चिनी भांडी आढळली. डॉल्फिनचे ठसे असलेल्या बंदुकाही आढळून आल्या. 

टॅग्स :Colombiaकोलंबिया