शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

पाकिस्तानी हवाई हद्दीतून सावधपणे प्रवास करा; अमेरिकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 3:26 AM

कमी उंचीवरून उड्डाण करणाऱ्या विमानांवर दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता

नवी दिल्ली : दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेऊन अमेरिकी विमानांनी पाकिस्तानी हवाई हद्दीतून सावधपणे प्रवास करावा, असा इशारा ट्रम्प सरकारने दिला आहे. यासंदर्भात अमेरिकी हवाई कंपन्या, तसेच पायलटना दक्षता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. तणावाचे वातावरण असलेल्या भारत व पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता नसली, तरीदेखील दोन्ही देशांच्या हवाई दलांनी परस्परांवर अचानक हल्ले चढविल्यास अमेरिकी विमानांना धोका पोहोचू शकतो, असेही या इशाºयात म्हटले आहे.या महिन्याच्या एक जानेवारीपासून ते संपूर्ण वर्षभर पाकिस्तानी हवाई हद्दीतील स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे अमेरिकेच्या हवाई वाहतूक खात्याने (एफएए) म्हटले आहे. यासंदर्भात अमेरिकेने आपल्या विमान कंपन्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानात विमानतळावर उतरलेल्या किंवा कमी उंचीवरून उड्डाण करणाºया विमानांवर दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता अधिक आहे. विमान उड्डाण करताना किंवा उतरताना दहशतवादी त्याला लक्ष्य करू शकतात. यासंदर्भात एफएएच्या वेबसाईटवर ३० डिसेंबर रोजी माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, काश्मीरमधील वातावरण आणखी बिघडले तर पाकिस्तानच्या हवाई हद्दीतला धोका वाढू शकतो.२६ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोटवर हल्ला चढवून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले होते. त्यानंतर दुसºया दिवशी पाकिस्तानच्या हवाई दलानेही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही देशांतील संबंध आणखी बिघडले होते. त्याचा दाखलाही या वेबसाईटवरील माहितीत देण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)विमानही होऊ शकते लक्ष्यपाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांनी तेथील विमानतळांवर, तसेच अमेरिकी कंपन्यांच्या विमानांवर अद्यापपर्यंत हल्ले चढविलेले नाहीत; पण तसा घातपात करण्यासाठीची शस्त्रसामग्री या दहशतवादी संघटनांकडे आहे व त्याचा ते केव्हाही उपयोग करू शकतात.२५ हजार फुटांवरून उडणाºया विमानावरही हे दहशतवादी हल्ला करू शकतात. युनायटेड, डेल्टा या अमेरिकी कंपन्या व एअर इंडिया यांची भारत ते अमेरिकेदरम्यान थेट विमानसेवा आहे.