पाकिस्तानी हवाई हद्दीतून सावधपणे प्रवास करा; अमेरिकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:26 AM2020-01-04T03:26:24+5:302020-01-04T03:26:29+5:30

कमी उंचीवरून उड्डाण करणाऱ्या विमानांवर दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता

Travel cautiously through Pakistani airspace; America's Warning | पाकिस्तानी हवाई हद्दीतून सावधपणे प्रवास करा; अमेरिकेचा इशारा

पाकिस्तानी हवाई हद्दीतून सावधपणे प्रवास करा; अमेरिकेचा इशारा

Next

नवी दिल्ली : दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेऊन अमेरिकी विमानांनी पाकिस्तानी हवाई हद्दीतून सावधपणे प्रवास करावा, असा इशारा ट्रम्प सरकारने दिला आहे. यासंदर्भात अमेरिकी हवाई कंपन्या, तसेच पायलटना दक्षता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. तणावाचे वातावरण असलेल्या भारत व पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता नसली, तरीदेखील दोन्ही देशांच्या हवाई दलांनी परस्परांवर अचानक हल्ले चढविल्यास अमेरिकी विमानांना धोका पोहोचू शकतो, असेही या इशाºयात म्हटले आहे.

या महिन्याच्या एक जानेवारीपासून ते संपूर्ण वर्षभर पाकिस्तानी हवाई हद्दीतील स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे अमेरिकेच्या हवाई वाहतूक खात्याने (एफएए) म्हटले आहे. यासंदर्भात अमेरिकेने आपल्या विमान कंपन्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानात विमानतळावर उतरलेल्या किंवा कमी उंचीवरून उड्डाण करणाºया विमानांवर दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता अधिक आहे. विमान उड्डाण करताना किंवा उतरताना दहशतवादी त्याला लक्ष्य करू शकतात. यासंदर्भात एफएएच्या वेबसाईटवर ३० डिसेंबर रोजी माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, काश्मीरमधील वातावरण आणखी बिघडले तर पाकिस्तानच्या हवाई हद्दीतला धोका वाढू शकतो.

२६ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोटवर हल्ला चढवून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले होते. त्यानंतर दुसºया दिवशी पाकिस्तानच्या हवाई दलानेही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही देशांतील संबंध आणखी बिघडले होते. त्याचा दाखलाही या वेबसाईटवरील माहितीत देण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)

विमानही होऊ शकते लक्ष्य
पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांनी तेथील विमानतळांवर, तसेच अमेरिकी कंपन्यांच्या विमानांवर अद्यापपर्यंत हल्ले चढविलेले नाहीत; पण तसा घातपात करण्यासाठीची शस्त्रसामग्री या दहशतवादी संघटनांकडे आहे व त्याचा ते केव्हाही उपयोग करू शकतात.

२५ हजार फुटांवरून उडणाºया विमानावरही हे दहशतवादी हल्ला करू शकतात. युनायटेड, डेल्टा या अमेरिकी कंपन्या व एअर इंडिया यांची भारत ते अमेरिकेदरम्यान थेट विमानसेवा आहे.

Web Title: Travel cautiously through Pakistani airspace; America's Warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.