भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 14:24 IST2025-09-25T14:23:20+5:302025-09-25T14:24:06+5:30
गाझा शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र विध्वंस झाला आहे. नूर अबू हसीरा आणि तिच्या तीन निष्पाप मुलींचं यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहेत.

भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
इस्रायलच्या भीषण हल्ल्यांमुळे गाझा शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र विध्वंस झाला आहे. नूर अबू हसीरा आणि तिच्या तीन निष्पाप मुलींचं यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहेत. गाझा शहरातील एका घराच्या तळघरात जखमी अवस्थेत हसीरा पडून आहे, वेदनेने ती तडफडत आहे. "आमची कबर इथेच बांधली जाईल. आम्ही मरणार आहोत, पण आम्ही इतर कुठेही जाणार नाही" असं ती सतत म्हणत आहे.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला, ज्यामध्ये १,२०० लोक मारले गेले आणि २५१ जणांचं अपहरण केलं. तेव्हापासून, इस्रायलचा रोष संपूर्ण गाझावर विनाश घडवत आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या मते, इस्रायली हवाई हल्ल्यात ६५,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. डिसेंबरमध्ये इस्रायलने गाझामधील हसीरा राहत असलेल्या अपार्टमेंट इमारतीवर हल्ला केला. हसीरा आणि तिची तीन मुली एका काँक्रीटच्या खांबाखाली गाडल्या गेल्या.
युद्धाने सर्व काही उद्ध्वस्त
हसीराला खांद्यावर, पाठीवर आणि पायांना दुखापत झाली. ती कोमात गेली होती. हसीरा म्हणते की, जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती रुग्णालयात होती. युद्ध सुरू होण्यापूर्वी, गाझा शहर अंदाजे १० लाख लोकांचं घर होतं. २३ महिन्यांच्या संघर्षादरम्यान, बहुतेक लोक पळून गेले आहेत. हसिरा तिच्या तीन मुली - जोरी, मारिया आणि महासोबत एका तळघरात लपून राहत आहे. हसीराच्या पतीने १० वर्षांपासून चांगलं जीवन जगण्यासाठी पैसा वाचवला, युद्धाने सर्व काही उद्ध्वस्त केलं.
अन्न खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत
हसीराकडे आता अन्न खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसेही नाहीत. युद्धामुळे अन्नाचे भाव गगनाला भिडले आहेत. एक किलो पीठ ६० डॉलर (अंदाजे ५,००० रुपये) पर्यंत पोहोचले आहे आणि एक किलो साखर १८० डॉलर (अंदाजे १६,००० रुपये) पर्यंत पोहोचली आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा आहे. लोक उपाशी फिरत आहेत.
सर्वच ठिकाणी गंभीर परिस्थिती
दक्षिण गाझाला जाण्यासाठी आणि टेंट उभारण्यासाठी २,००० डॉलर कसे मिळवायचे याचाच विचार हसीरा करते. ती जखमी आहे आणि हालचाल करू शकत नाही. जरी ती तिथे गेली तरी समस्या संपणार नाहीत. टेंटसाठीमध्ये मुलींची सुरक्षा, पिण्याचे पाणी, थंडीपासून संरक्षण आणि कीटकांचा धोका आवश्यक असणार आहे. हसीराने गाझामध्ये ११ वेळा आपल्या राहण्याचं ठिकाण बदललं. सर्वच ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे