शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

CoronaVirus News: ३५ राज्यांतील व्यवहार होणार सुरू, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 4:00 AM

आताचा काळ अमेरिकेसाठी वाईट असला तरी येणारा काळ निश्चितच चांगला असेल, असे आश्वासक बोलही त्यांनी या वेळी व्यक्त केले.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील तब्बल ३५ राज्यांनी अर्थचक्राचे रुतलेले चाक बाहेर काढण्यासाठी योजना सादर केली असून, काही राज्यांनी केंद्रीय प्रशासनाशी त्या बाबत संपर्क साधला असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. आताचा काळ अमेरिकेसाठी वाईट असला तरी येणारा काळ निश्चितच चांगला असेल, असे आश्वासक बोलही त्यांनी या वेळी व्यक्त केले. जगभरामधे कोरोनाबाधितांचा आकडा बत्तीस लाखांवर गेला असून, त्या पैकी दहा लाखांहून अधिक रुग्ण एकट्या अमेरिकेतच आहेत. बहुतांश राज्यांनी नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला होता. तसेच, अनेक कंपन्यान्यांचे कामकाज वर्क फ्रॉम होम सुरू आहे. बंदमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. जवळपास २ कोटी ६० लाख नोकरदारांनी बेरोजगारीच्या फायद्यासाठी दावे दाखल केले आहेत. दाव्यांची ही संख्या लवकरच तीन कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक राज्यांतून अर्थ व्यवहार सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. ट्रम्प यांनी १६ एप्रिल रोजी व्यवहार हळूहळू सुरु करण्याची सूचनाही केली होती. विमा कंपन्यांना बेरोजगारांना भत्ता द्यावा लागू नये म्हणून या कंपन्या अर्थव्यवहार सुरू करण्यासाठी दबाव टाकत असल्याचेही बोलले जात आहे.अमेरिकन अर्थव्यवस्था पहिल्या तिमाहिमधे उणे असेल. मात्र, चौथ्या तिमाहीमधे अर्थव्यवस्थेचा गाडा रुळ्वार येईल. या कठिण स्थितीतील एक मोठी सीमारेषा आपण पार केली आहे. माला, पुढे आशेचा किरण स्पष्ट दिसतोय. पुढील काळात भरपूर मागणी असेल. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षे आपल्यासाठी निश्चितच फलदायी असेल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दीड महिन्यापासून अमेरिकन नागरिकांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन केल्याने नवीन बाधितांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. कोरोनामुळे देशाला झालेली जखम हळूहळू भरत आहे. देशातील ३५ राज्यांनी व्यवसाय सुरु करण्यासाठी योजना सादर केल्या आहेत. अनेक राज्य केंद्रीय प्रशासनाशी संपर्क साधून सल्ला घेत आहेत. त्यावर आम्ही सातत्याने काम करीत असल्याचे अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सांगितले.

सोशल डिस्टन्सिंगचा कालावधी वाढविणार नाही : डोनाल्ड ट्रम्पसोशल डिस्टन्सिंगचे नियम गुरुवारी समाप्त झाल्यानंतर याचा कालावधी वाढविणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प म्हणाले की, पुढील आठवड्यात आपण एरिजोनाला जात आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिला दौरा आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्या