शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आता भारताला शेजारी देशांबरोबर व्यापार करणं होणार सोपं, बिमस्टेक देशांसाठी करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 13:21 IST

मोटर व्हेईकल अॅग्रीमेंट हा करार भारतासह बंगालच्या उपसागरासंबंधी देशांमधील व्यापाराचे स्वरुप पालटून टाकणार आहे.

नवी दिल्ली- बंगालच्या उपसागराच्या जवळ असणाऱ्या सर्व देशांमध्ये रस्तेमार्ग सुधारुन त्यांचा व्यापारासाठी आता उपयोग केला जाणार आहे. त्यासाठी बिमस्टेकच्या ( द बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टोरल टेक्नीकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन) च्या सात सदस्यांनी मोटर व्हेइकल अॅग्रीमेंट कराराचा मसुदा तयार केला आहे. जर या मसुद्याप्रमाणे सर्व गोष्टी नीट झाल्या तर भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, थायलंड आणि श्रीलंका या देशांचा व्यापार अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे.आता या कराराच्या मसुद्यावर हे सर्व देश विचार करतील आणि नंतर यावर्ष अखेरीस नेपाळ येथे होत असलेल्या बिमस्टेकच्या बैठकीमध्ये त्यावर चर्चा होईल. 1997 मध्ये बिमस्टेकची स्थापना करण्यात आली होती. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी  22 टक्के लोकसंख्या या देशांमध्ये राहाते. मोटर व्हेईकल अॅग्रीमेंटमुळे या देशांमध्ये प्रवास करताना वाहनांना केवळ एका परवान्याच्या मदतीने प्रवास करता येणार आहे. तसेच हा परवाना ऑनलाइनही मिळवता येणार आहे.बिमस्टेकमधील पाच देशांच्या सीमा भारताशी भिडलेल्या आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये असणाऱ्या पेट्रापोल या सीमाकेंद्रावरती मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते आणि आशियातील सर्वात व्यस्त सीमाकेंद्र म्हणून ते ओळखले जाते. भारत आणि बांगलादेश यांच्यामधील 60 टक्के व्यापार या केंद्रावरुन होतो. तसेच रक्सौल या बिहारमधील सीमाकेंद्रातून नेपाळला दररोज 800 ट्रक्स माल जातो.

या सर्व देशांमध्ये मोटर व्हेईकल अॅग्रीमेंटमुळे वाहतूक व मालाची ने-आण वेगाने होणार असली तरी आजवर त्यामध्ये अनेक अडथळे आले. 2014 साली सार्कमध्ये भारताने या कराराचा प्रस्ताव ठेवला होता मात्र त्याचा पाकिस्तानने विरोध केला. 2015 साली बांगलादेश, भारत., नेपाळ आणि भूतान यांच्या बीबीआयएन या संघटनेने त्याला मंजूरी दिली मात्र भूतान संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने त्यास मंजूरी दिली नाही. आता मोटर व्हेईकल अॅग्रीमेंट बिमस्टेक समोर येणार आहे. तेथील सदस्य देशांनी त्यास मंजुरी दिल्यावर मात्र भारतीय़ उपखंडातील देशांना लाभ होणार आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकIndiaभारतNepalनेपाळBhutanभूतानMyanmarम्यानमार