आॅस्ट्रेलियात शीख व्यक्तीवर वांशिक टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 04:09 IST2018-10-24T04:09:17+5:302018-10-24T04:09:26+5:30

पोर्ट आॅगस्टा शहर परिषदेची निवडणूक लढवत असलेले शीख समाजाचे नेते सनी सिंग यांच्यावर ट्रकमधून जात असलेल्या एकाने वांशिक टीका केली.

Topic Criticism on Sikh person in Australia | आॅस्ट्रेलियात शीख व्यक्तीवर वांशिक टीका

आॅस्ट्रेलियात शीख व्यक्तीवर वांशिक टीका

मेलबोर्न : पोर्ट आॅगस्टा शहर परिषदेची निवडणूक लढवत असलेले शीख समाजाचे नेते सनी सिंग यांच्यावर ट्रकमधून जात असलेल्या एकाने वांशिक टीका केली. सिंग यांच्या प्रचारासाठी बनवलेल्या जाहिरात फलकावर ही टीका करण्यात आली. माझ्यावर माझ्या वंशावरून स्थानिक समाजातून समाज माध्यमात व्हिडिओद्वारे टीकेला तोंड देण्याची ही माझी पहिलीच वेळ होती, असे सनी सिंग म्हणाले. फेसबुक पेजवर टाकण्यात आलेल्या व्हिडिओत सिंग यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

Web Title: Topic Criticism on Sikh person in Australia

टॅग्स :sikhशीख