2022 पर्यंत जगभरात 550 कोटी मोबाईल युजर्स, भारत असणार अग्रस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 17:20 IST2017-07-19T17:13:59+5:302017-07-19T17:20:04+5:30
भारतामध्ये मोबाईल वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे

2022 पर्यंत जगभरात 550 कोटी मोबाईल युजर्स, भारत असणार अग्रस्थानी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - सध्या जगभरात मोबाईलचा वापर वाढत चालला असून भारत एक मोठी बाजारपेठ म्हणून उभी राहत आहे. भारतामध्ये मोबाईल वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 2022 पर्यंत जगभरात एकूण 550 कोटी मोबाईल डिव्हाईस असतील. आणि यामध्ये सर्वात मोठा वाटा भारताचा असणार आहेत. तोपर्यंत मोबाईल युजर्सच्या बाबतीच भारत पहिल्या क्रमांकावर असेल.
टेलिकॉम रेग्युलेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) दिलेल्या माहितीनुसार भारतात सध्या अंदाजे 100 कोटी मोबाईल फोन युजर्स आहेत. 100 कोटी मोबाईल फोन युजर्सपैकी 30 टक्के म्हणजेच 30 कोटी युजर्सजवळ स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन युजर्सपैकी 94 टक्के लोक अॅड्रॉईड किंवा आयओएस ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात.
इतर ताज्या बातम्या
73 टक्के युजर्स अॅड्रॉईडचा वापर करतात. तर 21 टक्के युजर्सकडे आयओएस आहे. फक्त चार टक्के युजर्स विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करतात.
मोबाईल फोनसोबत टॅब्लेटची मागणी आणि वापर वाढत आहे. मात्र ग्राहकांची टॅब्लेटची मागणी गेल्या काही दिवसांमध्ये कमी होत चालली आहे. टॅब्लेट डिमांडमध्ये 3.3 टक्क्यांची घट झाली आहे. तर व्यवहारिक वापरासाठीची मागणी 6.9 टक्क्यांनी वाढली आहे.
2022 पर्यंत जगभरात एकूण 550 कोटी मोबाईल डिव्हाईस उपलब्ध असतील, आणि भारतामध्ये सर्वात जास्त मोबाईल युजर्स असणार आहेत.
भारतात लँडलाईन वापरणा-यांची संख्या 2.53 कोटी आहे. तर दूरसंचार वापरकर्त्यांची आकडेवारी 104 कोटींवर पोहोचली आहे. जानेवारी महिन्यात 70 लाख लोकांनी दूरसंचार वापरास सुरुवात केली. एअरटेलने सर्वात जास्त 25 लाख ग्राहक जोडले आहेत. तर आयडीयाने 12.51 लाख आणि वोडाफोनने 11.12 लाख ग्राहक जोडले आहेत. बीएसएनएल चौथ्या क्रमांकावर असून 9.25 लाख ग्राहक जोडले गेले. टेलिनोरने 7.24 लाख, एअरसेलने 4.35 लाख आणि रिलायन्स कम्युनिकेशनने 3.15 लाख नवे ग्राहक जोडले आहेत.