शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इराणशी युद्ध करण्याआधी अमेरिकन नौसैनिक आपसातच भिडले! जगातील सर्वात मोठ्या युद्धनौकेवर रंगले 'टॉयलेट वॉर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 05:36 IST

USS Gerald R. Ford Toilet War: इराणला घेरणारं अमेरिकेचं USS जेराल्ड आर. फोर्ड हे जहाज सध्या टॉयलेटच्या समस्येमुळे चर्चेत आहे. ५००० सैनिकांमध्ये वादावादी सुरू असून सीवेज सिस्टीम फेल झाल्याने नौसैनिक बेहाल झाले आहेत.

सध्या जगभरात युद्धाचे वारे आहेत. पश्चिम आशिया युद्धाच्या तोंडावर उभं आहे. होणार होणार असा अंदाज असलेलं युद्ध अखेर सुरू झालं. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला. यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई ठार झाले. मात्र, या पार्श्वभूमीवर आणखी एक वेगळंच युद्ध सध्या चर्चेत आहे.

इराणवर हल्ल्याच्या तयारीत असलेलं अमेरिकेचं यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड हे अतिबलाढ्य जहाज गेल्यावर्षीच्या जूनपासूनच इराणजवळ समुद्रात तैनात आहे. जगातली ही सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका आहे. कोणत्याही विमानवाहू जहाजाची तैनात साधारणपणे नऊ महिन्यांची असते, पण लष्करी हालचाली वाढल्या की ती वाढवली जाते. याच कारणानं अमेरिकेनं आपलं हे जहाज समुद्रात तैनात ठेवलं आहे. 

या विशालकाय जहाजात अमेरिकेचे तब्बल पाच हजार सैनिक सज्ज आहेत. पण हे जहाज सध्या एका वेगळ्याच कारणानं गाजतं आहे आणि संपूर्ण जगभरात ते चर्चेचा केंद्रबिंदू ठरलं आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध प्रत्यक्षात सुरू होण्याच्या बऱ्याच आधी या जहाजावर ‘टॉयलेट वॉर’ सुरू झालं आहे. इराणला घेरून उभे असलेले अमेरिकन सैनिक एका वेगळ्याच कारणानं आपसातच भांडायला लागले! 

या भांडणाचं सर्वांत मोठं कारण आहे टॉयलेट! या जहाजावर तब्बल ६५० टॉयलेट्स आहेत आणि त्यावरूनच अमेरिकन सैनिकांमध्ये वादावादी आणि ‘वॉर’ सुरू झालं होतं. या टॉयलेटमध्ये आधी कोण जाईल, यावरून या सैनिकांमध्येच हमरीतुमरी सुरू झाली. कारण, जहाजावरील सीवेज सिस्टीम पूर्णपणे फेल झाली. बहुतांश टॉयलेट्स जाम झाली. यामुळे जहाजावर असलेल्या सैनिकांचं आयुष्य अक्षरशः बेहाल झालं. जहाजावरील जी काही मोजकी टॉयलेट्स चालू अवस्थेत होती, त्याचा वापर करण्यासाठी या सैनिकांना दररोज किमान पाऊण तास रांगेत उभं राहावं लागत होतं, आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही.

परिस्थिती इतकी वाईट आहे की टॉयलेट्सच्या कमतरतेमुळे प्लम्बिंग आणि दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या टेक्निशियन आणि नौसैनिकांमध्येच सातत्यानं वादावादी सुरू आहे. सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी टेक्निशियन युद्धजन्य स्थितीतही दररोज तब्बल १९ तासांपेक्षा अधिक वेळ काम करताहेत. खरं तर ही समस्या एका तांत्रिक त्रुटीशी संबंधित आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलं तरी हे जहाज एका नाजूक व्हॅक्युम-आधारित सीवेज सिस्टीमवर अवलंबून आहे. केवळ एका व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाला तरी संपूर्ण जहाजावरची सर्व टॉयलेट्स बंद पडू शकतात.हे जहाज २०२५ पासून समुद्रात तैनात आहे. यावर्षी जानेवारीमध्ये याच जहाजानं व्हेनेझुएलावर झालेल्या अमेरिकन कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यात अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली होती. सलग समुद्रात तैनात असल्यामुळे या जहाजाची नियमित देखभाल करता आलेली नाही.

प्रत्येक वेळी सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी ॲसिड फ्लशवर सुमारे चार लाख डॉलर्स खर्च येतो. जहाजावरील अनेक नौसैनिक २० ते २५ वयोगटातले आहेत. सततची ड्यूटी आणि दीर्घ तैनातीमुळे ते वैतागले आहेत. कुटुंबापासून दीर्घकाळ दूर राहण्याबरोबरच टॉयलेटसारख्या कारणांवरून त्यांच्या संतापाचा पाराही वाढला आहे. इराण-अमेरिका युद्धापेक्षाही नेटवर या ‘टॉयलेट वॉर’चीच चर्चा अधिक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US Navy Fights Itself on Warship Before Iran Conflict!

Web Summary : Before Iran tensions, US sailors on the USS Gerald R. Ford warship faced a 'toilet war' due to a broken sewage system. With 650 toilets malfunctioning, long queues and frustration mounted, straining the crew already weary from prolonged deployment and family separation. Repairs cost millions.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाwarयुद्ध