शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

आर्थिक संकटातील श्रीलंका एअरलाईन विकणार; वेतनासाठी नोटा छापणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 6:02 AM

श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी जनतेला संबोधित करताना सांगितले की, एअरलाईन्सला गत आर्थिक वर्षात तब्बल १२४ दशलक्ष डॉलर्सचा फटका बसला.

कोलंबो : आर्थिक संकटात सापडलेली श्रीलंका नुकसान भरून काढण्यासाठी राष्ट्रीय एअरलाईन विकण्याच्या तयारीत आहे. त्याचप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी नोटांची छपाई करण्यात येणार आहे.

श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी टीव्हीवरून जनतेला संबोधित करताना सांगितले की, एअरलाईन्सला मार्च २०२१मध्ये संपलेल्या वर्षात तब्बल १२४ दशलक्ष डॉलर्सचा फटका बसला. ज्यांनी विमानात पायही ठेवलेला नाही, त्यांच्यापर्यंत या नुकसानीची झळ जाता कामा नये, असेही ते म्हणाले.ते म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी आपल्याला नोटा छापाव्या लागणार आहेत. आपल्याकडे सर्वच साठे मर्यादित असून, तीन जहाज भरून क्रूड तेल व घासतेलची किंमत मोजण्यासाठी डॉलर्सची उभारणी करण्यात येत आहे. पुढील काही महिने आपल्यासाठी खूपच कठीण असणार आहेत. आपल्याला संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची आघाडी स्थापन करावी लागणार आहे. 

दरम्यान, राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या विकास बजेटच्या जागी मदत बजेटची घोषणा करण्याचाही त्यांनी प्रस्ताव ठेवला. संसद ट्रेझरी बिलाची मऱ्यादा ३ ट्रिलियनवरून ४ ट्रिलियन करण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे. डिसेंबर २०२२ मध्ये समाप्त होणाऱ्या वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादनातील आर्थिक तूट १३ टक्के असण्याचा अंदाज आहे, असेही विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाairplaneविमान