पश्चिम आशियातील तणाव आता एका धोकादायक वळणावर आला आहे. इराणकडून संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याच्या शक्यतेमुळे सौदी अरेबिया आणि बहारिनला जोडणारा २५ किलोमीटर लांबीचा 'किंग फहद कॉजवे' मंगळवारी सकाळी तातडीने बंद करण्यात आला आहे. यामुळे बहारिनचा उर्वरित जगाशी असलेला रस्ते संपर्क तुटला असून संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
किंग फहद कॉजवे अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाच्या पूर्व प्रांताला लक्ष्य करून इराण हल्ला करण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्यात आली आहे. हा पूल केवळ दळणवळणाचे साधन नसून बहारिनसाठी 'लाईफलाईन' मानला जातो, कारण बहारिनला जमिनीवरून जोडणारा हा एकमेव मार्ग आहे.
बहारिनमध्ये अमेरिकेचे महत्त्वाचे तळबहारिनमध्ये अमेरिकन नौदलाचा 'पाचवा ताफा' तैनात आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता संघर्ष पाहता, बहारिनला लक्ष्य करणे इराणसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरू शकते.
ट्रम्प यांची 'डेडलाईन' आणि बॉम्बफेकीची धमकीदुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. 'होर्मुझची सामुद्रधुनी' मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत खुली न केल्यास इराणचे पॉवर प्लँट आणि पायाभूत सुविधा बॉम्बने उडवून देण्याची थेट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ही डेडलाईन आता संपत आल्याने जगाचे लक्ष या युद्धाच्या पुढच्या टप्प्याकडे लागले आहे.
Web Summary : Amid Iran's potential missile threat, Saudi Arabia closed the King Fahd Causeway to Bahrain. This isolates Bahrain, home to a key US naval base. Trump threatened to bomb Iranian infrastructure if the Strait of Hormuz isn't reopened by tonight.
Web Summary : ईरान के संभावित मिसाइल खतरे के बीच सऊदी अरब ने बहरीन के लिए किंग फहद कॉजवे बंद कर दिया। इससे बहरीन अलग-थलग पड़ गया, जहाँ एक महत्वपूर्ण अमेरिकी नौसेना बेस है। ट्रंप ने होर्मुज जलडमरूमध्य को आज रात तक फिर से नहीं खोलने पर ईरानी बुनियादी ढांचे पर बमबारी करने की धमकी दी।