एक अपत्य धोरणाला किंचित घातली मुरड
By Admin | Updated: September 8, 2014 03:37 IST2014-09-08T03:37:55+5:302014-09-08T03:37:55+5:30
चीनचे वादग्रस्त ‘एक अपत्य’ धोरण शिथिल करण्यात आले असून आता दाम्पत्यांना दुसऱ्या अपत्याला जन्म देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

एक अपत्य धोरणाला किंचित घातली मुरड
बीजिंग : चीनचे वादग्रस्त ‘एक अपत्य’ धोरण शिथिल करण्यात आले असून आता दाम्पत्यांना दुसऱ्या अपत्याला जन्म देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
राजधानी बीजिंग शहरातील २१,२४९ दाम्पत्यांपैकी १९, ३६३ दाम्पत्यांना दुसऱ्या मुलाला जन्म देण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे महानगरपालिकेचे आरोग्य व कुटुंब नियोजन आयुक्तांनी सांगितले.
ज्यांना दुसऱ्या मुलाला जन्म देण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्यातील जवळपास ५६ टक्के महिलांचे वय ३१ ते ५५ वर्षादरम्यान आहे. तसेच ५३७ महिलांचे वय ४० वर्षांपेक्षा अधिक आहे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी हे वादग्रस्त धोरण स्वीकारण्यात आले होते.
(वृत्तसंस्था)