आत्मघाती जॅकेट फेकून ‘ती’ पळाली

By Admin | Updated: February 13, 2016 02:12 IST2016-02-13T02:12:29+5:302016-02-13T02:12:29+5:30

बोको हराम या अतिरेकी संघटनेने त्या तीन मुलींवर आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी सोपविली खरी; पण हल्ल्याची वेळ जवळ येताच त्यातील एक मुलगी अंगाला

Throwing a suicidal jacket, she ran away | आत्मघाती जॅकेट फेकून ‘ती’ पळाली

आत्मघाती जॅकेट फेकून ‘ती’ पळाली

अबुजा (नायजेरिया) : बोको हराम या अतिरेकी संघटनेने त्या तीन मुलींवर आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी सोपविली खरी; पण हल्ल्याची वेळ जवळ येताच त्यातील एक मुलगी अंगाला बांधलेले स्फोटकांचे जॅकेट फेकून चक्क पळून गेली. नायजेरियातील या घटनेने लहान मुलांचा चाललेला गैरवापर पुन्हा अधोरेखित झाला आहे. अन्य दोन मुलींनी केलेल्या आत्मघातकी स्फोटात ५८ जण ठार झाले आहेत. या मुलींवर बोको हरामने हल्ल्याची जबाबदारी सोपविली होती. उर्वरित दोन मुलींनी मात्र दिकवा रिफ्युजी कॅम्पमध्ये स्वत:ला उडवून दिले.

Web Title: Throwing a suicidal jacket, she ran away