अमेरिकेत गोळीबारात ३ पोलीस ठार, तिघे जखमी

By Admin | Updated: July 18, 2016 07:16 IST2016-07-17T23:29:41+5:302016-07-18T07:16:11+5:30

अमेरिकेच्या पूर्वेकडील बॅटन रोग शहरात झालेल्या गोळीबारात तीन पोलीस ठार, तर अन्य तीन जण जखमी झाले.

Three policemen killed, three injured in US firing | अमेरिकेत गोळीबारात ३ पोलीस ठार, तिघे जखमी

अमेरिकेत गोळीबारात ३ पोलीस ठार, तिघे जखमी

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 17 - अमेरिकेच्या पूर्वेकडील बॅटन रोग शहरात झालेल्या गोळीबारात तीन पोलीस ठार, तर अन्य तीन जण जखमी झाले. बॅटन रोगच्या शेरीफ कार्यालयाच्या प्रवक्त्या कॅसे रेबोर्न हिक्स यांनी ही माहिती रविवारी दिली. एक संशयित ठार झाला असून, आणखी दोघे संशयित फरार झाले असावेत, असे पोलीस अधिकाऱ्यांना वाटते. गोळीबार सकाळी नऊच्या सुमारास झाला ते ठिकाण पोलीस मुख्यालयापासून दीडपेक्षाही कमी मैलावर आहे. या घटनेनंतर गोरे आणि कृष्णवर्णीय यांच्यात शहरात, तसेच देशात तणाव निर्माण होईल अशी भीती आहे. संशयित किंवा संशयितांबद्दल लगेचच काही माहिती उपलब्ध झाली नाही.

Web Title: Three policemen killed, three injured in US firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.