बेल्जियममध्ये गोळीबारात दोन पोलिसांसह तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 05:25 IST2018-05-30T05:25:25+5:302018-05-30T05:25:25+5:30

येथे एका बंदूकधारी इसमाने केलेल्या गोळीबारात दोन पोलिसांसह तीन जणांचा मृत्यू झाला. या हल्लेखोरालाही नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून ठार मारले

Three people including two policemen were killed in firing in Belgium | बेल्जियममध्ये गोळीबारात दोन पोलिसांसह तीन ठार

बेल्जियममध्ये गोळीबारात दोन पोलिसांसह तीन ठार

ब्रसेल्स : येथे एका बंदूकधारी इसमाने केलेल्या गोळीबारात दोन पोलिसांसह तीन जणांचा मृत्यू झाला. या हल्लेखोरालाही नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून ठार मारले. ही घटना पूर्व बेल्जियमच्या लीज शहरात सकाळी एका शाळेजवळ घडली. हे ठिकाण राजधानीपासून ९० किमी दूर आहे.
या हल्लेखोराचा काय हेतू होता ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला अद्याप याची काहीच माहिती मिळाली नाही. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार हल्लेखोराने एका कॅफेमधील दोन पोलिसांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो जवळच्या शाळेकडे पळाला. तेथे त्याने एका महिलेला ओलीस ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी या बंदूकधारी इसमाला गोळ्या घातल्या.
बेल्जियमचे गृहमंत्री जेन जाम्बोन यांनी सांगितले की, सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नेमके काय झाले? याचा शोध आम्ही घेत आहोत. या भागात नाकेबंदी करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Three people including two policemen were killed in firing in Belgium