एकाच विमानातील तीन प्रवाशांना आला हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 21:37 IST2019-12-05T21:36:43+5:302019-12-05T21:37:38+5:30
एकाचवेळी हृदयविकाराचा झटका आलेले दांपत्य वाचले.

एकाच विमानातील तीन प्रवाशांना आला हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू
इस्लामाबाद : आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कधी कोणते आजारपण उद्भवेल याचा नेम नाही. विमान प्रवासात जेव्हा विमान हवेत उड्डाण करते तेव्हा अनेकदा प्रवाशांना हृदयविकाराचा झटका येतो. ही काही नवीन बाब नाही. पण एकाच विमानात एकापेक्षा जास्त प्रवाशांना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. यातील एका प्रवाशाचा मृत्यूही झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानातील सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स (पीआयए)मध्ये ही घटना घडली आहे. पीआयएच्या जेद्दाहून इस्लामाबादला जाणाऱ्या विमानात एका दांपत्यासह तीन प्रवाशांना एकाचवेळी हृदयविकाराचा झटका आला. यापैकी महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर दांपत्याचे प्राण वाचले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पाकिस्तान टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. विमान जेव्हा विमानतळावर पोहोचले तेव्हा सीसीएची एक टीम अँम्बुलन्स, डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ पाठविण्यात आली. या टीमने महाला बीबीला मृत घोषित केले व दांपत्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.