पॅलिस्टाईन युवकाच्या हत्येप्रकरणी तीन इस्रइली अटकेत
By Admin | Updated: July 7, 2014 20:03 IST2014-07-07T20:03:38+5:302014-07-07T20:03:38+5:30
मोहम्मद अबु खदेर या १६ वर्षाच्या युवकाची दोन जुलै रोजी निघृणहत्या करण्यात आली होती. मोहम्मदचा खून करून त्याचा मृतदेह जाळण्यात आला होता

पॅलिस्टाईन युवकाच्या हत्येप्रकरणी तीन इस्रइली अटकेत
ऑनलाइन टीम
जेरूसलेम, दि. ७ - मोहम्मद अबु खदेर या १६ वर्षाच्या युवकाची दोन जुलै रोजी निघृणहत्या करण्यात आली होती. मोहम्मदचा खून करून त्याचा मृतदेह जाळण्यात आला होता. या गुन्ह्यातील सहापैकी तीन आरोपींना पकडण्यात येथील पोलिसांना यश आले आहे. रविवारी त्यांना पेटाह ट्विक्वा येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींनी आपण हा गुन्हा केल्याचे कबुल केले असून ही हत्या म्हणजे जुन महिन्यात तीन इस्राइली युवकांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्याचाच बदला म्हणून या युवकाची हत्याकेली असल्याचेही आरोपींनी सांगितले आहे. या प्रकरणामुळे इस्राइल आणि पॅलिस्टाईन मध्ये वातावरण तणावपूर्ण आहे.