जर्मनीत फुटबॉल टीमच्या बसजवळ तीन स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 06:50 IST2017-04-12T01:01:10+5:302017-04-12T06:50:33+5:30
जर्मनीमधील डॉर्टमुंडमध्ये बोरूस्सिया डॉर्टमुंड फुटबॉल टीमच्या बसजवळ तीन स्फोट झाले. या स्फोटात एक खेळाडू जखमी झाला आहे.

जर्मनीत फुटबॉल टीमच्या बसजवळ तीन स्फोट
ऑनलाइन लोकमत
डॉर्टमंड, दि. 12 - जर्मनीमधील डॉर्टमंडमध्ये बोरोसिया डॉर्टमंड फुटबॉल टीमच्या बसजवळ तीन स्फोट झाले. या स्फोटात एक खेळाडू जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील चॅम्पियन लीगच्या सामन्यासाठी बोरोसिया डॉर्टमंड फुटबॉल टीम बसमधून जात होती. यावेळी बसजवळ तीन स्फोट झाले. या स्फोटांमुळे बसच्या काचा फुटल्या असून एक खेळाडू जखमी झाला आहे. सुदैवाने बाकीच्या खेळाडूंना कोणतीही इजा झाली नाही. मार्क बारत्रा असे जखमी झालेल्या खेळाडूचे नाव असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर येथील मंगळवारी होणारा डॉर्टमंड आणि मोनाको यांच्यातील चॅम्पियन लीगचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. हा सामना आता बुधवारी खेळविला जाणार आहे. तसेच, या स्फोटांचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याचा तपास पोलीस करत आहेत.
German police say player for German soccer team Borussia Dortmund injured after explosions near team bus ahead of Champions League QFinal:AP
— ANI (@ANI_news) April 11, 2017