पाकिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटानं हादरला, तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 23:25 IST2017-08-11T23:24:52+5:302017-08-11T23:25:01+5:30
पाकिस्तानमधील चार मांग जिल्ह्यातील बजोर येथे दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणला आहे.

पाकिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटानं हादरला, तिघांचा मृत्यू
इस्लामाबाद, दि. 11 - पाकिस्तानमधील चार मांग जिल्ह्यातील बजोर येथे दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या बॉम्बस्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला असून, 26 जण जखमी आहे. अधिका-यांच्या माहितीनुसार, चार मांग जिल्ह्यातील मजुरांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे.
बजोरमध्ये मजुरांना घेऊन जाणा-या वाहन रस्त्यावर आयईडी बॉम्बस्फोट घडवून उडवून दिली. या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला असून, 26 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. घटनास्थळी पाकिस्तान लष्कराचे सुरक्षा जवान पोहोचले असून, सर्च ऑपरेशन राबवलं आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्लाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. राजगल घाटीमध्ये ऑपरेशन खैबर-4 सुरू असतानाच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. हा भाग पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर वसलेला आहे.