लाहोरमध्ये स्फोट होऊन तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: April 5, 2017 11:27 IST2017-04-05T11:27:13+5:302017-04-05T11:27:13+5:30
लाहोरमधील बेडिअन येथे झालेल्या गूढ स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत

लाहोरमध्ये स्फोट होऊन तिघांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 5 - लाहोरमधील बेडिअन येथे झालेल्या गूढ स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार गाडीतील गॅस सिलेंडर फुटल्याने हा स्फोट झाला आहे. ही गाडी परिसरात पार्क करण्यात आली होती.
वृत्तपत्राने गॅस सिलेंडरमुळे स्फोट झाल्याचं सांगितलं असताना सुरक्षायंत्रणांनी मात्र हा आत्मघाती हल्ला होता असा दावा केला आहे. स्फोट इतका भीषण होता की यामुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इतर गाड्यांनाही आग लागली.
स्फोटानंतर सुरक्षा जवानांनी परिसर सीलबंद केला असून सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे. जखमींना कम्बाईन्ड मिलिट्री रुग्णालय आणि सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आलं आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.