कॅनडात विमान क्रॅश, दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 13:20 IST2023-10-07T13:17:03+5:302023-10-07T13:20:12+5:30
या विमानात दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाला.

कॅनडात विमान क्रॅश, दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू
कॅनडातील व्हँकुव्हरजवळ चिलीवॅक येथे एक विमान क्रॅश झाले. या विमान अपघातात दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान परिसरातील एका हॉटेलच्या इमारतीच्या मागे असलेल्या झुडपात कोसळले. अपघातात मृत्यू मृत्युमुखी पडलेल्या दोन भारतीय वैमानिकांची नावे अभय गद्रू आणि यश विजय रामुगडे असून ते मुंबईचे रहिवासी होते.
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू; घटनेने न्यू जर्सीत खळबळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे आणि या परिसरात कोणतीही जीवितहानी किंवा लोकांना धोका असल्याची कोणतीही माहिती नाही. पाईपर पीए-३४ सेनेका नावाच्या छोट्या ट्विन-इंजिन विमानात हा अपघात झाला. पाइपर PA-34 ची निर्मिती 1972 मध्ये झाली आणि 2019 मध्ये नोंदणी झाली.
याबाबतची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.