शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

धमक्या अन् मंदिरांतही तोडफोट! ट्रुडोंच्या राज्यात हिंदूंसाठी 'नरक' बनलाय कॅनडा, गुप्तचर संस्था सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 15:22 IST

खालिस्तानी दहशतवादी येथील हिंदूंना धमक्या देत आहेत. हे दहशतवादी हिंदू मंदिरांवर हल्ले करून तेथे तोडफोडही करत आहेत...

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या धोरणामुळे येथील हिंदूंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ट्रुडो सरकार उघडपणे खलिस्तानवाद्यांचे समर्थन करते. तर, खालिस्तानी दहशतवादी येथील हिंदूंना धमक्या देत आहेत. हे दहशतवादी हिंदू मंदिरांवर हल्ले करून तेथे तोडफोडही करत आहेत. एवढेच नाही तर, निज्जरच्या हत्येनंतर, भारत आणि कॅनडा यांच्यात तणावाचे वातावरण असतानाच येथील खालिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदूंना देश सोडण्याचीही धमकी दिली आहे. मात्र, अशा प्रकारच्या धमक्या, द्वेष भावना पसरवणाऱ्या आहेत, असे कॅनाडा सरकारने म्हटले आहे.

भारतीय गुप्तचर संस्थाही सतर्क -कॅनडात राहणाऱ्या भारतीयांच्या हितासासाठी भारतीय गुप्तचर संस्थाही सतर्क आहेत. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत कॅनडातील वाढती कट्टरता आणि हिंदू समुदायासाठी उभ्या राहणाऱ्या आव्हानांसंदर्भात चर्चा करण्यात आली. गेल्या 5-6 वर्षांत कॅनडातील बदललेल्या परिस्थितीसंदर्भात बोलायचे झाल्यास, 2016 ते 2021 दरम्यान कनाडामध्ये स्थाईक झालेल्या लोकांमध्ये 18 टक्के लोक भारतीय आहेत. तर कॅनाडाच्या एकूण लोकसंख्येत 2.1 टक्के शिख आणि 2.3 टक्के हिंदू आहेत. 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसंदर्भात भारतावर तथ्यहीन आरोप केल्याने, कॅनडामध्ये या दोन्ही समुदायांमधील तणाव वाढला आहे. मात्र जस्टिन ट्रुडो यांच्या या आरोपांकडे राजकीय फायद्यासंठी उचललेले एक पावूल म्हणून बघितले जात आहे.

हिंदू आणि शिख समुदायात फूट पाडण्याचा प्रयत्न - शिख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असलेल्या गुरपतवंत सिंह पन्नूनने कॅनाडात राहणाऱ्या हिंदूंना भारतात परतण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावरही व्हिडिओ पोस्ट केला होता. भारतीय वंशाचे हिंदू कॅनडाच्या राज्यघटनेचा सन्मान करत नाहीत, असे त्याचे म्हणणे होते. यानंतर, ट्रुडो यांच्याच पक्षातील खासदार चंद्रा आर्या यांनी म्हटले आहे की, कॅनडामध्ये राहणारे बहुसंख्य हुंदू घाबरलेले आहेत. तसेच, खालिस्तानी दहशतवादी हिंदू-कॅनडीयन आणि शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :CanadaकॅनडाsikhशीखHinduहिंदूJustin Trudeauजस्टीन ट्रुडोTerrorismदहशतवाद