शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

संचारबंदी उठवताच न्यूयॉर्कमध्ये हजारो लोकांनी केली शांततापूर्ण निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 02:14 IST

महापौर बिल डी. ब्लासिया यांनी रविवारी आंदोलनापूर्वी शहरात रात्री ८ वाजेपासून संचारबंदी हटविण्याचे निर्देश दिले

न्यूयॉर्क : एकही अप्रिय घटना न घडल्यामुळे न्यूयॉर्कमधील संचारबंदी घटविण्यात आली. त्यानंतर हजारो लोकांनी शांततापूर्ण निदर्शने केली. पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध सुरू असलेल्या या आंदोलनाच्या वेळी शहरातील रस्त्यांवरील अवरोधक हटविण्यात आले. आंदोलकांना मॅनहटनमध्ये ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल व टॉवरपर्यंत पोहोचता यावे, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. तथापि, यावेळी रात्री संचारंबदी लावण्याचे भय उरले नव्हते.

महापौर बिल डी. ब्लासिया यांनी रविवारी आंदोलनापूर्वी शहरात रात्री ८ वाजेपासून संचारबंदी हटविण्याचे निर्देश दिले. त्यापूर्वी शनिवारी रात्री कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडली नव्हती, दुकानांत तोडफोडसुद्धा करण्यात आली नव्हती. मात्र, त्या आधीच्या रात्री मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. डी. ब्लासिया यांनी रविवारी सकाळी म्हटले होते की, ज्या कोणी शांततापूर्ण पद्धतीने आपले विचार व्यक्त केले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी संचारबंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रामाणिकपणे सांगतो की, न्यूयॉर्क सिटीमध्ये संचारबंदी लावण्याची ही अखेरची वेळ असावी, असे वाटते.रविवारीही शहरात शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्यात आली. त्यात आंदोलकांनी मॅनहटनमध्ये मार्च काढला व घोषणा दिल्या. संचारबंदी हटविण्यात आली असली तरी अधिकाऱ्यांनी आंदोलकांना कोरोनाची तपासणी करण्याचे आवाहन केले.न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँर्ड्यूक्योमो यांनी रॅली व मार्चमध्ये सहभागी लोकांना मास्क घालण्याचे, तसेच कोरोनाची तपासणी करण्याचे आवाहन केले. यासाठी १५ तपासणी केंद्रे उघडण्यात येतील व त्यांचे अहवाल लवकरात लवकर प्राप्त होतील, असेही ते म्हणाले.न्यूयॉर्कमध्ये दशकभरात प्रथमच संचारबंदीच्न्यूयॉर्कमध्ये मागील अनेक दशकांत प्रथमच संचारबंदी लागू करण्यात आली होती. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपासून बंद असलेले शहर खुले करतानाच संचारबंदीही हटविण्यात यावी, असे अधिकाऱ्यांचे नियोजन होते.जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्ययात्रेची तयारी सुरूच्ह्युस्टन : श्वेतवर्णीय पोलीस अधिकाºयाच्या हातून मारल्या गेलेल्या कृष्णवर्णीय आफ्रिकी-अमेरिकी जॉर्ज फ्लॉयडवर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्याचे मित्र व नातेवाईकांनी अंत्ययात्रेची तयारी सुरू केली आहे.च्ह्युस्टननिवासी फ्लॉयडचा २५ मे रोजी मिनियापोलीसमध्ये एका पोलीस अधिकाºयाने त्याच्या मानेवर गुडघा दाबून धरल्यानंतर मृत्यू झाला होता.च् अंत्यसंस्कारानंतर एक श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये माजी उपराष्टÑाध्यक्ष जो बाईडेन यांच्या श्रद्धांजलीचा व्हिडिओ संदेश दाखवला जाणार आहे. ते व्यक्तिगतरीत्या यावेळी हजर राहणार नाहीत.

टॅग्स :Americaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या