शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:36 IST

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये २६५ लोकांचा मृत्यू झाला. यामुळे आता जगभरात विमान अपघातांची चर्चा सुरू आहे.

गुजरातमधील अहमदाबामध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्याविमानाचाअपघात झाला. या अपघातामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला. एअर इंडियाचेविमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. यानंतर पूर्ण परिसरात धूर पहायला मिळाला. या अपघाताने जगभरात खळबळ उडाली. दरम्यान, जगभरात विमान प्रवास सुरक्षेच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या. 

दरम्यान, आता युक्रेनमधील एरोस्पेस अभियंता तातारेन्को व्लादिमीर निकोलायेविच यांनी एक नवीन विमान डिझाइन केले आहे. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी केबिन विमानापासून वेगळे करता येईल आणि लोकांचे जीव वाचतील.

इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...

३ वर्षांच्या परिश्रमानंतर डिझाइन तयार केले

तातारेन्को यांनी ३ वर्षांहून अधिक काळ कठोर परिश्रमानंतर हे डिझाइन तयार केले. ते २०१६ मध्ये लोकांसमोर सादर करण्यात आले. त्यांनी एक संकल्पना विमान डिझाइन केले आहे यामध्ये प्रवासी केबिन वेगळे करता येते. त्यानुसार, टेक ऑफ, फ्लाइट किंवा लँडिंग दरम्यान विमानात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, प्रवासी केबिन वेगळे होईल.

या प्रवासी केबिनमध्ये एक पॅराशूट जोडलेले असेल, जे आपोआप उघडेल आणि प्रवासी केबिन हळूहळू खाली उतरू लागेल. जर हे केबिन पाण्यात पडले तर त्याला जोडलेल्या फुगवता येणाऱ्या नळ्या त्याला तरंगत राहण्यास मदत करतील. प्रवाशांच्या सामानासाठी विमानात विशेष व्यवस्था देखील केली जाईल.

केबिन हलकी पण मजबूत असणार

तातारेन्को व्लादिमीर निकोलाविच यांचे म्हणणे आहे की, मानवी चुकांवर नियंत्रण ठेवता येत नाही, परंतु त्यासाठी तयारी करता येते. हे केबिन केवलर आणि कार्बन फायबरपासून बनवले जाईल, जे केवळ हलकेच नाही तर खूप मजबूत देखील असेल. 

आता या डिझाइनमुळे विमानांमध्ये अशी व्यवस्था बनवावी की नाही यावर एक नवीन वाद सुरू झाला आहे. डिझाइनचे टीकाकारांचे मत आहे की, वेगळे केबिन नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही, त्यामुळे ते पर्वत, लोकसंख्या असलेल्या भागात किंवा जंगलात पडू शकते.तर अनेकांनी यामध्ये पायलटची अजिबात काळजी घेतली नसल्याचे म्हटले आहे. 

अनेकांनी या डिझाईनला समर्थन दिले आहे.यासाठी जास्त किमतीची तिकिटे खरेदी करण्यासही तयार आहेत. ही डिझाइन किती व्यावहारिक असेल हे भविष्यात कळेल. विमान तयार करणे आधीच महाग आहे. अशा परिस्थितीत, जर ही प्रणाली त्यात समाविष्ट केली तर किंमत आणखी वाढू शकते.

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघातAir Indiaएअर इंडिया